Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dainik Gomantak
मनोरंजन

दयाबेन नंतर आता 'हे' पात्र सोडणार TMKOC शो

टीव्हीवरील नंबर वन कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे चाहते जगभरात आहेत.

दैनिक गोमन्तक

टीव्हीवरील नंबर वन कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) चाहते जगभरात आहेत. शोची लोकप्रियता ही त्यामधील मजेदार पात्रांमुळे आहे. पण बातमी अशी आहे की शोमधील एक मुख्य पात्र हा लोकप्रिय शो सोडणार आहे. होय! शैलेश लोढा यांच्याबद्दल अशी बातमी आहे की त्यांनी शोचे शूटिंग थांबवले असून 14 वर्षांनंतर तो या शोला अलविदा करणार आहे. (Shailesh Lodha Tarak Mehta Ka Ulta Chashma is about to leave the series)

शोच्या शेवटी, शैलेश म्हणजेच तारक मेहता समाजाला नक्कीच काहीतरी चांगला संदेश देतो. यामुळेच या फॅमिली शोला सर्व वयोगटातील लोकांची पसंती आजवर मिळाली आहे. या शोमध्ये हसतखेळत समाज कसा सुधारायचा हेही दाखवण्यात आले. आता शैलेश शो सोडल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर शैलेशने गेल्या एका महिन्यापासून शोचे शूटिंग थांबवले. आता तो स्वत:साठी नवीन संधी शोधताना दिसून येत आहे. असे देखील सांगितले जात आहे की शैलेश त्याच्या शूटिंगच्या तारखांमुळे शोच्या निर्मात्यांवर खूश नाहीये.

ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शैलेशने या शोसाठी अनेक मोठ्या ऑफर्स नाकारल्या आहेत. आता अशी अटकळ बांधली जात आहे की शैलेश लोढा यांना काही चांगली ऑफर आली आहे, ज्यासाठी त्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधीही या शोमध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वाकानीही शोमधून बाहेर गेली. त्यानंतर शोच्या निर्मात्यांना दयाबेन मिळू शकली नाहीये. प्रेक्षक दयाबेनची वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT