Shahrukh Khan -Salman Viral Video  Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh - Salman Viral Video: बाबा सिद्दीकी यांच्या पार्टीतला शाहरुख - सलमानचा हा व्हिडीओ का व्हायरल होतोय?

अभिनेते शाहरुख आणि सलमान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

Shahrukh - Salman Viral Video: रमजानचा पवित्र महिना संपत आला आहे. या आठवड्यात चंद्रावर अवलंबून 21 किंवा 22 एप्रिल रोजी ईदचा सणही साजरा केला जाईल.

अशा परिस्थितीत ठिकठिकाणी इफ्तार पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. बाबा सिद्दीकी आता मागे का राहायचे? त्यांची इफ्तार पार्टी प्रसिद्ध आहे. जिथे कित्येक सेलिब्रिटी पोहोचतात. 

इथं सलमान खानची उपस्थिती 100% कायम आहे. यावेळी त्याच्यासोबत शाहरुख खानही दिसला. दोघांनाही पापाराझींनी स्पॉट केले आहे. तिथे हे दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ खरा आहे की नाही चला पाहुया.

पापाराझी हँडल व्हायरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान दोघेही पहिल्यांदा एकमेकांचा हात धरून मीडियासमोर पोज देताना दिसत आहेत. यानंतर शाहरुख आणि सलमानने कॅमेऱ्यासमोर एकमेकांना मिठी मारली. 

इतकंच नाही तर सलमान मित्र शाहरुखला कारपर्यंत ड्रॉप करतो. शाहरुख त्याच्या गालाचे चुंबन घेतो आणि मग तो त्याच्या अगदी नवीन कारमधून निघून जातो.

आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. एका यूजरने लिहिले - व्वा, दोघेही देखणे आहेत. एकाने लिहिले - बॉलीवूडचा राजा. त्याच वेळी, काहींनी त्याला बनावट म्हटले.

 एकाने लिहलेय, हा व्हिडिओ सलमान खानच्या वाढदिवसाचा आहे, जो इफ्तार पार्टीच्या नावाने शेअर केला जात आहे. याची खात्री करण्यासाठी काही जुने व्हिडिओ शोधले आणि सत्य समोर आले.

हा जुना व्हिडीओ आहे. सलमान खानच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खान बांद्रा येथे पोहोचला होता.

बहीण अर्पिता खान शर्मानेही तिच्या मुंबईतील घरी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्यादरम्यान दोघेही एकत्र दिसले. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर त्याच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्याच वेळी, आता त्याचा 'जवान' आणि 'डंकी' पाइपलाइनमध्ये आहेत. दुसरीकडे, सलमान खानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर 'टायगर 3' दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

SCROLL FOR NEXT