Jawan Day 2 Box office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Collection : जय जवान ! शाहरुखने मारली 100 कोटींची बाजी...

शाहरुखच्या जवानने दुसऱ्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत नवा उच्चांक गाठला आहे.

Rahul sadolikar

शाहरुख खानचा जवान 7 सप्टेंबरला रिलीज झाला असुन चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी आश्चर्यकारक कमाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपासुन जवानचे प्रमोशन आणि चाहत्यांचे शाहरुखबद्दलचे वेड पाहता हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल हे स्पष्टच दिसत होतं. चला पाहुया चित्रपटाचे कलेक्शन आणि त्यावरच्या प्रतिक्रिया.

पहिल्या दिवसाची कमाई

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई करत एक नवा रेकॉर्ड केला होता. अॅटली दिग्दर्शित, जवान या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत.

100 कोटींचा टप्पा सहज पार

शाहरुखच्या जवानने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर  100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने कमाल केली आहे. 7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या जवानची सोशल मिडीयावरही जोरदार क्रेज दिसत आहे.

Sacnilk.com नुसार , चित्रपटाने पहिल्या शुक्रवारी 75 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाच ;पण समीक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

एकूण 127 कोटींचा गल्ला

Sacnilk.com च्या मते, सुरुवातीच्या अंदाजानुसार, जवानने भारतात रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाषांसाठी  53 कोटी नेट कमावले . गुरुवारी या चित्रपटाने 74.5 कोटींची कमाई केली . 

या चित्रपटाने हिंदीमध्ये  65.5 कोटी, तमिळमध्ये 5.3 कोटी आणि तेलगूमध्ये 3.7 कोटी कमावले. आतापर्यंत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 127.50 कोटी आहे.

शाहरुखने शेअर केली नोट

जवान पाहिल्यानंतर चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिसादावर शाहरुखने X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) एक नोट शेअर केली. शाहरुख लिहिले, "#Jawan साठी प्रेम आणि कौतुकाबद्दल धन्यवाद!! सुरक्षित आणि आनंदी रहा… कृपया चित्रपटांचा आनंद लुटत असलेल्या तुम्हा सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत राहा.... आणि मी लवकरच परत येईन. ! तोपर्यंत... थिएटरमध्ये जवानांसोबत पार्टी करा!! खूप प्रेम आणि कृतज्ञता!"

राजामौलींनी केलं कौतुक

जवानने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यानंतर शुक्रवारी, चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनीही शाहरुख आणि अॅटलीचं कौतुक केलं आहे. 

राजामौलींनी अधिकृत ट्विट्टर म्हणजेच आताच्या X वर, पोस्ट केले, "यामुळेच @IamSRK हा बॉक्स ऑफिसचा बादशाह आहे. किती धमाल उडवणारी सुरुवात आहे.

राजामौलींनी पुढे लिहिलं आहे, उत्तरेतही यशाची मालिका सुरू ठेवल्याबद्दल @Atlee_dir चे अभिनंदन आणि अदभुत यशाबद्दल #जवानच्या टीमचंही .. ."

शाहरुखचे राजामौलींना उत्तर

राजामौली यांच्या पोस्टला उत्तर देताना शाहरुखने लिहिले, "खूप खूप धन्यवाद, सर. आम्ही सर्व तुमच्या सिनेमासाठीच्या क्रिएटिव्ह इनपुटमधून शिकत आहोत.

कृपया जमेल तसे पहा. मग मला सांगण्यासाठी कॉल करा की मी मास हिरो होऊ शकतो का. . प्रेम आणि अभिवादन सर."

महेश बाबूने केलं कौतुक

अभिनेता महेश बाबूनेही X वर जवान टीमचेही कौतुक केले. त्यांनी लिहिले, "#जवान... ब्लॉकबस्टर सिनेमा... @Atlee_dir स्वतः राजासोबत किंग साइज मनोरंजन देतो!! त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट घेऊन येतो... आभा, करिष्मा आणि स्क्रीन प्रेझेन्स @iamsrk अतुलनीय आहेत…!! जवान स्वत:चे रेकॉर्ड मोडेल… किती मस्त आहे ते!!.”

शाहरुखचं उत्तर

शाहरुखने उत्तर दिले, “खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ते आवडले म्हणून प्रत्येकजण खूप रोमांचित आहे. तुम्हाला आणि कुटुंबाला खूप प्रेम. तुमचे दयाळू शब्द ऐकून खूप उत्साहवर्धक. मनोरंजनासाठी आता आणखी मेहनत करत राहीन. तुझ्यावर प्रेम आहे, माझ्या मित्रा. ”

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT