Bollywood actor Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan Accident: अपघातानंतर किंग खान मुंबईत दाखल; व्हिडिओ आला समोर

Shahrukh Khan: आपली पत्नी गौरी खानबरोबर दिसून आला आहे.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: किंग खान नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. कधी तो त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो तर कधी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आता मात्र तो त्याच्या अपघातामुळे चर्चेत आहे. त्याच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना धक्का बसला होता.

शाहरुख खान आपल्या एका शूटसाठी लॉस एंजेलिसला गेला होता. यावेळी त्याचा अपघात होऊन त्याच्या नाकतून रक्त येऊ लागल्याची माहीती समोर आली आहे. या अपघातानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली असून तो आता भारतात परतला आहे.

शाहरुख खानच्या अपघाताची बातमी समजताच चाहते चिंतेत पडले होते मात्र आता किंग खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांची चिंता दूर झाली आहे. लॉस एंजेलिसवरुन परताना मुंबई एअरपोर्टवर शाहरुख आपली पत्नी गौरी खानबरोबर दिसून आला. त्यावेळी तो एकदम स्वस्थ दिसून आला आहे. यावेळी तो तंदुरुस्त आणि उत्तम दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरदेखील कोणतेही सर्जरी दिसून आली नाही. त्यामुळे शाहरुखचे चाहते खूश झाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेत शाहरुख कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता याबद्दल कोणतीही माहीती मिळाली नसून त्याच्या टीमनेदेखील याबद्दल माहीती दिली नाही. किंग खानचा हा पहिला अपघात नसून याआधीदेखील शूटिंग दरम्यान अनेकदा अपघाताला त्याला समोर जावे लागले आहे.

'चेन्नई एक्सप्रेस'च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानला 8 सर्जरी कराव्या लागल्या होत्या. इतकेच नाही 'रईस' चित्रपटावेळी त्याला झालेल्या अपघातामुळे चेहऱ्याची सर्जरी करावी लागली होती. दरम्यान, शाहरुख लवकरच जवान चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

'पठाण'ला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर आता जवान चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT