Shahid Kapoor
Shahid Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Shahid Kapoor: अमेझॉन प्राइम व्हिडिओने प्रदर्शित केलेला 'फर्जी'मधला शाहिद कपूरचा कॅरेक्टर व्हिडिओ पाहिलात का?

गोमन्तक डिजिटल टीम

प्राइम व्हिडिओची आगामी सिरीज 'फर्जी'मध्ये शाहिद कपूर कॉन आर्टिस्टची भूमिका साकारत आहे. शाहिदच्या या आगळ्या वेगळ्या भूमीकेची आणि चित्रपटाची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे.

सिरीजमधल्या शाहिद कपूरच्या कॅरेक्टरचा व्हिडीओ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडीओतून नक्कीच शाहिदच्या कॅरेक्टरची कल्पना आपल्याला येवु शकते. प्राईम व्हिडीओने ट्वीट्टरवरुन याची माहिती दिली आहे.

अमेझॉन प्राइम व्हिडिओची आगामी क्राईम थ्रिलर सिरीज 'फर्जी'मधील 'आर्टिस्ट' सनीची झलक पाहण्यासाठी दर्शकांची उत्सुकता वाढत असतानाच, प्राइम व्हिडिओने आता शाहिद कपूरचा कॅरेक्टर व्हिडिओ रिलीज केला आहे.

या व्हिडिओमध्ये सनी उर्फ ​​आर्टिस्ट आपल्या क्रिएटिव स्किल्सचा वापर बनावट नोटा बनवत आयुष्याची मजा घेणारं कॅरेक्टर दिसतं. तसेच, व्हिडिओमध्ये राशी खन्नाची देखील झलक पाहायला मिळते, राशीच्या कामाविषयीही चर्चा होत आहे

'फर्जी'ही आठ भागांची क्राईम थ्रिलर सिरीज आहे ज्यामध्ये राज आणि डीके यांच्या सिग्नेचर ह्युमर पाहायला मिळणार असून, एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टच्या नजरेतून एलीट क्लासची बाजू घेणाऱ्या सिस्टमला फेल करण्याचा प्रयत्न दाखवला आहे.

ही सिरीज ओटीटीवर रिलीज होणार असुन. 'फर्जी' 10 फेब्रुवारीपासून प्राइम व्हिडिओवर भारत आणि 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT