Shahid Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Shahid Kapoor: सर्वांचे अंदाज फ्लॉप ठरवत शाहिदच्या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर दमदार सुरुवात

Shahid Kapoor: हा चित्रपट जास्त कमाई करणार नाही, बॉक्स ऑफीसवर चित्रपट फ्लॉफ ठरेल असे म्हटले जात होते.

दैनिक गोमन्तक

Shahid Kapoor: शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंग कमी प्रमाणात झाल्याने हा चित्रपट जास्त कमाई करणार नाही, बॉक्स ऑफीसवर चित्रपट फ्लॉफ ठरेल असे म्हटले जात होते. मात्र चित्रपटाने आता मोठा गल्ला जमवायला सुरुवात केली आहे. चला तर जाणून घेऊयात शाहिदच्या या चित्रपटाने किती कमाई केले आहे.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ने चित्रपटगृहांमध्ये दुसऱ्या दिवशी भारतात सुमारे 9.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तेरी बातों में ऐसा उल्झा जियाने शुक्रवारी 6.7 कोटी रुपये जमा केले, आतापर्यंत भारतात सुमारे 16.20 कोटी रुपये कमावले आहेत. मंगळवारी व्हॅलेंटाईन डे पर्यंत म्हणजेच १४ फेब्रुवारी पर्यंत हा चित्रपट आपला कमाईचा वेग कायम ठेवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चित्रपट निर्माते अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये शाहिद कपूर सिफ्रा (क्रिती सेनॉन) नावाच्या रोबोटशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सने बनवला आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया हे दिग्गज कलाकारही आहेत. वेगळी कल्पना असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का आणि बॉक्स ऑफीसवर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT