Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Controversy: 'पठाण'चा 7 राज्यात विरोध, बिहारमध्ये शाहरुख-दिपीकाच्या विरोधात FIR दाखल

शाहरुखच्या पठाणला 7 राज्यातुन विरोध होत आहे, तर बिहारमध्ये शाहरुख-दिपीकाच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे

Rahul sadolikar

शाहरुखच्या (Shah Rukh Khan) आगामी पठाण चित्रपटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात आणि महाराष्ट्र या 7 राज्यात चित्रपटाला विरोध होत आहे. या सर्व राज्यात या चित्रपटाच्या विरोधात आंदोलनं होत आहेत.

बिहार राज्यातील मुजफ्फरपुर इथं धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शाहरुख खान आणि दिपीका पदुकोण या दोघांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगढमध्ये चित्रपटातुन 'बेशरम रंग' हे गाणं हटवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. गाणं हटवलं नाही तर चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेकडुन देण्यात आला आहे.

उत्तरप्रदेश मध्येही हिंदु महासभेने चित्रपटाला विरोध करत कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या गाण्यात दिपीकाने (Deepika) घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत कारण हा सनातन धर्माचा अपमान आहे. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही अशी भुमीका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे.

गुजरातमध्ये विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या दोन संघटनांकडुन चित्रपटगृहाच्या मालकांना धमकी देण्यात आली आहे. या दोन्ही संघटनांनी असे म्हटले आहे की जर चित्रपट प्रदर्शित झाला आणि काही अनुचित घटना घडली तर त्याला चित्रपट गृहाचे मालक जबाबदार असतील. ही बॉलीवूडची हिंदुविरोधी विकृत मानसिकता आहे, असं या संघटनांचे मत आहे.

बिहारच्या मुजफ्फरनगरचे अधिवक्ता सुधीर ओझा यांनी चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा, शाहरुख खान, दिपीका पदुकोण यांच्यासह 5 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT