Sara Ali Khan Video:  Dainik Gomantak
मनोरंजन

Sara Ali Khan Viral Video: सारा अली खान मध्य प्रदेशातील महाकालच्या चरणी लीन,पाहा व्हिडिओ

विकी कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अभिनेत्री सारा अली खानने उज्जैनमध्ये महाकाल बाबाच्या भस्म आरतीला हजेरी लावली होती.

Puja Bonkile

Sara Ali Khan Viral Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सारा-विकी एकत्र काम करतांना दिसत आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सारा अली खानने उज्जैनमध्ये महाकाल बाबांचे दर्शन घेतले आणि भस्म आरतीला हजेरी लावली होती. साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • साराचा व्हिडिओ

एएनआयने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान महाकाल मंदिरात प्रार्थना केरतांना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सारा अली खान भक्तीमध्ये मग्न होऊन महाकाल बाबांची पूजा करताना दिसत आहे. साराचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सारा अली खान महाकाल मंदिरात भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन प्रार्थना करतांना दिसत आहे. बुधवारी सकाळी ही अभिनेत्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. 

भस्म आरतीनंतर त्या नंदी हॉलमध्ये शिवाचा नामजप करत सुमारे अर्धा तास ध्यानस्थ बसली होती. साराने तिसऱ्यांदा महाकाल मंदिराला भेट दिली आहे. भस्म आरतीनंतर तिने गर्भगृहाला भेट दिली. सकाळी 7 वाजता होणाऱ्या भोग आरतीतही ती सहभागी झाली होती. नंतर ती मंदिराच्या कोटी देवळाजवळ ध्यान करत बसली होती. साराचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • CSK जिंकताच विकी कौशल, सारा अली खान जोमात

दरम्यान, अहमदाबाद स्टेडियममध्ये विकी कौशल आणि सारा अली खान या क्षणाचे साक्षीदार असताना, रणवीर सिंग, अभिषेक बच्चन आणि सोनू सूद यासारख्या अनेकांनी सोशल मीडियावर या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.

  • इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींचा उत्साह

इन्स्टाग्रामवर, विकी कौशलने आयपीएल फायनलमध्ये सीएसकेने जीटीला पराभूत केल्यावर त्याचा आणि सारा अली खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी त्यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातील फिर और क्या चाहिये या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विकीने लिहिले आहे,

कोणी तुझ्या बदल्यात दुनिया दिली तरी ती दुनिया कोणाला हवी आहे!!! माही फॉर द विन!!! जड्डू तू रॉकस्टार !!! काय सामना आहे! GT… स्पर्धेतील सर्वोत्तम संघ. . #ipl2023 #iplfinal," 

  • सारा अली खानचे आगामी प्रोजेक्ट्स...

सारा अली खान नुकतीच 'गॅसलाइट' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सारा सध्या विकी कौशलच्या 'जरा हटके जरा बचके' मध्ये व्यस्त आहे.

हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज होणार आहे. दुसरीकडे, साराच्या आगामी चित्रपटांमध्ये Ae मेरे वतन के लोगोंचा समावेश आहे, जो Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. तर सारा 'मेट्रो इन दिनॉन' आणि 'मर्डर मुबारक' या चित्रपटांतून प्रक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT