Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: 'त्यांना वाटतं हिरोंनी क्लायमॅक्समध्ये ...' संदीप रेड्डी वंगाचा शाहरुखवर निशाणा?

Shahrukh Khan: मी ज्या नायकांची भूमिका करतो ते चांगले काम करतात, ते लोकांना आशा आणि आनंद देतात.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: अॅनिमल रिलिज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला जमवत धुमाकूळ घातला असला तरीही मोठ्या प्रमाणात टीकेलादेखील सामोरे जावे लागले आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा हे गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वादात अडकताना दिसत आहेत.आता ते शाहरुखमुळे चर्चेत आहेत.

शाहरुख एका कार्यक्रमात म्हणाला होता, 'मी आशावादी आहे आणि आनंदाने भरलेल्या गोष्टी सांगतो. मी ज्या नायकांची भूमिका करतो ते चांगले काम करतात, ते लोकांना आशा आणि आनंद देतात. जर मी वाईट माणूस झालो, तर मी त्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतो, कुत्र्यासारखा मारतो, कारण माझा विश्वास आहे की चांगले चांगले होते आणि वाईट वाईट होते. लोकांना स्वप्न पाहण्याची हिंमत देणारी प्रामाणिक पात्रे मला साकारायची आहेत.

आता संदीप रेड्डी वंगा यांनी देखील भविष्यात शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शाहरुखला मी दोनदा भेटलो होतो पण कामाच्या संदर्भात कधीच बोललो नाही असे त्याने सांगितले होते. वांगा म्हणाले होते की- मला नक्कीच शाहरुख खान आणि रणवीर सिंगसोबत काम करायचे आहे. आता शाहरुखला ते कोणत्या प्रकारची पात्राची विचारणा करतील हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

दरम्यान, नुकतेच किरण रावने संदीप रेड्डी वंगाच्या चित्रपटाविरोधात जे काही बोलले त्यावरून दिग्दर्शकाने आमिर खानवरही निशाणा साधला होता. संदीप रेड्डी वंगा यांनी सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत जे काही बोलले ते शाहरुख खानला टोमणे दिले असल्याचे म्हटले जात आहे. ते म्हणाले होते, 'त्यांना वाटतं हिरोनं क्लायमेक्समध्ये लेक्चर द्यावं, जिथे त्यानं आपल्या सगळ्या चूका मान्य कराव्या आणि हिरोनं मार खावा' अशा शब्दात त्याने टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT