प्रियांका होती म्हणून वडापाव 1000 ला विकला Dainik Gomantak
मनोरंजन

मुंबईचा वडापाव अमेरिकेत नेला अन् प्रियांका होती म्हणून 1000 ला विकला

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रियांकाने 'सोना' (Sona) या नावाने रेस्टॉरंट उघडले आणि तिथल्या भारतीय मेनूची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या अदाकारीने छाप सोडणारी 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमुळे चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रियांकाने 'सोना' (Sona) या नावाने रेस्टॉरंट उघडले आणि तिथल्या भारतीय मेनूची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे.

प्रियांकाच्या या नव्या रेस्टॉरंटमुळे अमेरिकावासियांना भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळते आहे. पाणीपुरी, डोसा, कुल्चा यांसारखे लोकप्रिय पदार्थ रेस्टॉरंटच्या मेनू कार्डमध्ये आहेत. तिच्या या रेस्टॉरंटला आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि अमेरिका वासीयांनी भेट दिली आहे. चित्रपट निर्माती लोला जेम्सनेही या रेस्टॉरंटमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान लोलाने प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये मुंबईचा फेमस असलेल्या वडापावचा फोटो Vada शेअर केला.

प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये वडापावसोबतच तिने भेळ, चाट आणि इतर भारतीय खाद्यपदार्थांचीही चव घेतली. 'सोना रेस्टॉरंट हे खरंच अनोखं आहे', असं कॅप्शन देत तिने वडापावचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. मात्र या रेस्टॉरंटमध्ये असलेल्या वडापावची किंमत एकून तुम्हाला धक्का बसेल. प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये एक वडापावची किंमत 14 युएस डॉलर्स म्हणजेच जवळपास एक हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे मुंबईकरांचा 10 रूपयाचा लोकप्रिय वडापाव आता न्यूयॉर्कमध्येही खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे.

प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये हे रेस्टॉरंट सुरू करताना सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. 'सोना या नावाने मी रेस्टॉरंट सुरू करत आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. न्यूयॉर्कमधील या नवीन रेस्टॉरंटमध्ये भारतीय पद्धतीचे जेवण अमेरिका वासियांनी त्याचबरोबर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनाही मिळणार आहे. यामध्ये हरीनेयक या शेफने नाविन्यपूर्ण आणि लज्जतदार मेनू तयार केले आहेत. माझे मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन यांच्या नेतृत्त्वाशिवाय हा प्रयत्न असफल झाला असता. डिझाइनर मेलिसा बॉवर्स आणि उर्वरित टीमचे आभार'. असे प्रियांकाने पोस्ट शेअर करत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT