Sameer Wankhede Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Controversy: समीर वानखेडे हाजीर हो...शाहरुखकडुन लाच घेतली की नाही? मुंबई हाय कोर्टात आज सिद्ध होणार

अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं

Rahul sadolikar

Sameer Wankhede Controversy: बहुचर्चित आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात त्यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे.

आर्यन खानला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. कारवाईच्या वेळेत रेकॉर्ड झालेले सीसीटिव्ही फूटेजही गायब असल्याने समीर वानखेडे यांच्याकडेच संशयाची सुई जात असल्याचं सध्या तरी दिसत आहे

मुंबई हायकोर्टात आज होणार निर्णय

समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप CBI ने केला आहे. हा आरोप खरा की खोटा हे आज ठरणार आहे. याबाबतचा न्यायालयाचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे.

मॉडेल मुनमुन धमेचा ठरली डोकेदुखी

मिड-डे ला दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन धमे भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल. अशी अपेक्षा आहे.

मुनमुन म्हणते "प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी केवळ मीडिया प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने माझ्यासारख्या अनेकांना खोट्या प्रकरणात गोवले आहे. त्यांना माहीत आहे की, मीडिया त्यांच्या कारवाईला कव्हरेज देईल. म्हणून वानखेडे सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रेटींना टार्गेट करत होते".

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी केलेला तो आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता एनसीबीच्या विरोधात अनेक सवाल उपस्थित केले होते. प्लेचर पटेल कोण आहे, म्हणत मलीकांनी एनसीबीवर निशाणा साधला.

प्लेचर पटेल आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा काय संबंध काय याचं उत्तर समीर वानखेडे यांच्यासाठी चांगलंच अडचणीचं ठरलं होतं.

तसेच प्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांचा फोटो एकत्र कसा आहे यासंबंधीही त्यांनी सांगावे. असंही मलीक म्हणाले होते त्याचबरोबर मलिकांनी एनसीबीने केलेल्या तिन्ही कारवायांमध्ये एकच पंच कसा काय असा सवालही उपस्थित केला आहे.

आर्यनला जामीन मंजूर झाला होता

ऑक्टोबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात, एनसीबीने मुनमुन धमेचासह आर्यन खान आणि इतरांना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. मुनमुन धमे आणि आर्यन खान यांना 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

पुराव्याअभावी मे २०२२ मध्ये एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावे नसली तरी एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात मॉडेल धमेचाचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले होते. आता पाहुया या प्रकरणात समीर वानखेडे यांचं काय होणार आहे..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT