Sameer Wankhede Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Controversy: समीर वानखेडेंना दिलासा? हाय कोर्ट म्हणाले...

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे.

Rahul sadolikar

Sameer Wankhede ex NCB Officer Mumbai High Court: गेले काही दिवस एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची चर्चा सुरूय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेनंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

मुंबई हायकोर्टानं वानखेडे यांना दिलासा दिला आहे. हाय कोर्टानं वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे यांना ८ जुन पर्यत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. अटकेपासून संरक्षण देण्याचा कोर्टाचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

8 जूनपर्यंत अटकेपासुन संरक्षण

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे यांना ८ जुन पर्यत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. अटकेपासून संरक्षण देण्याचा कोर्टाचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. यासगळ्या सगळ्यात कोर्टानं काही अटी वानखेडे यांच्यासमोर ठेवल्या आहेत.

त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हाट्स अप चॅट व्हायरल करता येणार नाही. यापूर्वी समीर वानखेडे यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांच्यातील चॅट हे व्हायरल केल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर कोर्टानं त्यांना समज दिली आहे.

समीर वानखेडेंनी पोलिस संरक्षणाची केली मागणी

समीर वानखेडे यांनी त्यांच्याकरिता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. आपल्याला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संरक्षण मिळावे, अशी मागणी वानखेडे यांनी कोर्टाकडे केली आहे.

यापूर्वी वानखेडे यांनी माध्यमांना आर्यन खान केस प्रकरणातील काही गोष्टी शेयर केल्या होत्या. त्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. आता कोर्टानं त्याकडे लक्ष वेधले आहे.

माहिती शेअर करताना काळजी घ्या

वानखेडे यापूर्वी कोणतीही माहिती माध्यमांकडे शेअर करताना काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे चॅट व्हायरल होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. असे कोर्टानं म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे चर्चेत आले आहे.

आर्यन खान अटकेप्रकरणी त्यांच्यावर २५ कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT