Sameer Khakhar Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Khakhar Passes Away: लोकप्रिय 'नुक्कड' मालिकेत कवटीची भूमिका करणाऱ्या या कलाकाराचे निधन...

नुक्कड कार्यक्रमात लोकप्रिय भूमीका साकारणाऱ्या समीर खक्कर या अभिनेत्याचं निधन झालं आहे

Rahul sadolikar

Sameer Khakhar Passes Away: दूरदर्शनचा एक सुवर्ण काळ होता जेव्हा खासगी चॅनल्सचं पेव आजच्या सारखं फुटलं नव्हतं पण तरीही विनोदी आणि कौैटुंबिक मालिका अगदी निखळपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होत्या.

अशीच एक मालिका त्या सुवर्णकाळात लोकांना हसवत होती ती म्हणजे नुक्कड..नुकतंच या मालिकेत एक लोकप्रिय भूमीका साकारणाऱ्या कलाकाराचं निधन झालं आहे.

दूरदर्शनच्या प्रसिद्ध शो 'नुक्कड'मध्ये कवटी ही व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धी पावलेले अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनाने इंडस्ट्री अजून बाहेर आली नव्हती की या प्रसिद्ध अभिनेत्या समीर खाखरच्या निधनाने इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. समीर खाखर यांचा मुलगा गणेश खाखर याने माध्यमांना ही माहिती दिली.

समीर खाखर मृत्यूचे कारणः 71 वर्षीय समीर खाखर यांचा मुलगा गणेश खाखर यांनी आम्हाला सांगितले की, मंगळवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर ते झोपी गेले आणि नंतर बेशुद्ध होऊ लागले. त्यांनी सांगितले की यानंतर त्यांनी डॉक्टरांना बोलावले आणि त्यांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितले. 

यानंतर त्यांना लघवीचा त्रास होऊ लागला. मुलगा म्हणाला, 'त्याचा शेवटचा काळ बेशुद्धावस्थेत गेला. लघवीचा त्रास झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर हृदयाने साथ देणे बंद केले.

मल्टिपल ऑर्गन निकामी झाल्याने पहाटे ४.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, समीरला बोरिवलीच्या एमएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

बुधवारी सकाळी 10.30 वाजता बोरिवली येथील भाभी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुलगा गणेश खाखर यांनी सांगितले.

90 च्या दशकात समीर चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा होता आणि तो 'पुष्पक', 'शहेनशाह', 'रखवाला', 'दिलवाले', 'राजा बाबू' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले होता. 1996 मध्ये त्यांनी भारत सोडला आणि अमेरिकेत राहू लागले.

समीर अमेरिकेला गेले आणि अभिनयाव्यतिरिक्त जावा कोडर म्हणून नोकरी मिळवल्याचे बोलले जाते. 2008 साली त्यांची नोकरी गेली होती असेही वृत्त आहे. तिथे त्यांना अभिनेता म्हणून कोणी ओळखत नसल्याने त्याला दुसऱ्या क्षेत्रात काम करावे लागले. समीरला भारतात ज्या काही भूमिका मिळाल्या त्या त्याच्या 'नुक्कड' या व्यक्तिरेखेवर आधारित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT