Samantha Ruth Prabhu  Dainik Gomantak
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: 'मी गेले ७ महिने बेरोजगार...' अभिनेत्रीचा खुलासा

Samantha Ruth Prabhu: सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत तिने आपण कामावर परतत असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. आता अभिनेत्रीने आपल्या आजाराबाबत अपडेट दिली आहे.

सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत तिने आपण कामावर परतत असल्याचे सांगितले आहे. आजारपणामुळे गेले सात महिने मी बेरोजगार आहे असेदेखील गंमतीने म्हटले आहे. याबरोबरच, आपल्या एका मित्रासोबत हेल्थ पॉडकास्टमध्ये दिसणार असल्याचे म्हटले आहे.

मी या हेल्थ पॉडकास्टसाठी खूप उत्साहित आणि भावनिक आहे. तो पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. सामंथाने गेल्या वर्षी खुलासा केला होता की ती ऑटो इम्यून कंडिशन (मायोसिटिस) या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे स्नायूंमध्ये खूप वेदना होतात. अभिनेत्रीने सांगितले होते की तिच्या डोळ्यात खूप जळजळ आहे. तसेच खूप अशक्तपणा आहे.

36 वर्षीय अभिनेत्रीने गेल्या वर्षी 'सिटाडेल इंडिया' या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले होते. यात वरुण धवनही मुख्य भूमिकेत आहे. प्रियांका चोप्राच्या वेब सीरिजचा हा हिंदी रिमेक आहे.

सामंथा विजय देवरकोंडासोबत 'कुशी' चित्रपटात दिसली होती. याआधी ती 'शाकुंतलम' चित्रपटात दिसली होती. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. आता तो 'सिटाडेल इंडिया' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT