Katrina Kaif and Salman Khan's Movie | Tiger 3 movie release date | Salman Khan Latest Movie  Dainik Gomantak
मनोरंजन

टायगर 3 चं 'लेके प्रभू का नाम' गाणं रिलीज... सलमानचा स्वॅग पुन्हा एकदा दिसणार

टायगर 3 चं लेके प्रभू का नाम गाणं रिलीज झालं असुन चाहत्यानी या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासून यशराज फिल्म्सच्या टायगर 3 ची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची रिलीज डेट समोर येईल तशी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी अरिजीत सिंहने गायलेल्या लेके प्रभू का नाम या गाण्याची झलक सलमानच्या चाहत्यांना पाहायला मिळाली होती. 23 ऑक्टोबर रोजी हे गाणं रिलीज झालं असुन चाहत्यांनी या गाण्याचं उत्साहात स्वागत केलं आहे.

लेके प्रभू का नाम

'टायगर 3' या बहुप्रतिक्षित चित्रपटातील 'लेके प्रभु का नाम' हे गाणे अखेर रिलीज झाले आहे. हे गाणे ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कारण सलमान खानच्या चित्रपटात पहिल्यांदाच प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने हे गाणे गायले आहे.

 त्यांच्या लढ्याबद्दल तर सर्वश्रुत आहेच, तेही सांगू, पण आधी बोलूया रिलीज झालेल्या गाण्याबद्दल.

सलमानचा कटरिनासोबतचा स्वॅग

सलमान खानने पुन्हा एकदा कतरिना कैफसोबतचा स्वॅग दाखवला आहे. जसे 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' मध्ये होते. या गाण्यात तुम्हाला 'माशाअल्लाह' आणि 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत' अशी अनुभूती मिळणार आहे. 

मात्र, आधीच्या गाण्यांच्या तुलनेत त्याची जादू थोडी कमी झाली आहे. असे असले तरी भाईजानच्या चाहत्यांमध्ये हे आधीच लोकप्रिय झाले आहे. गाणे रिलीज झाल्यापासून अर्ध्या तासातच याला यूट्यूबवर 721K व्ह्यूज मिळाले आहेत आणि 186K लोकांनी लाइक केले आहे.

टायगर चित्रपटाचा सिक्वल

'एक था टायगर' चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. गाण्यांपासून ते सलमान खान-कतरिना कैफच्या संवाद, कथा आणि केमिस्ट्रीपर्यंत या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. 'टायगर जिंदा है' या सिनेमाच्या सिक्वेलमध्येही सलमान - कटरिनाच्या जोडीचं प्रचंड कौतुक झालं. आता त्याचा तिसरा भाग 'टायगर 3' प्रदर्शित होत आहे.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT