Salman Khan Dance Video Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Dance Video: 'साथिया तूने क्या किया....'; गाण्यावर बॉक्सर निखत जरीनसह भाईजानचा रोमँटिक डान्स

Salman Khan And Boxer Nikhat Zareen: सलमानचा हा खास व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा भाईजान  सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान त्याच्या स्टाईलने अनेकांची मने जिंकतो. अलिकडेच सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉक्सर निखत जरीनसोबत (Nikhat Zareen) डान्स करताना दिसत आहे. 

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकवणारी बॉक्सर निखत जरीनने सोशल मिडियावर सलमान खानसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आणि निखत हे दोघे  'साथिया ये तूने क्या किया' या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमधील (Video) दोघांच्या केमिस्ट्रीला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.  निखत जरीन हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'फायनली इंतेजार खतम हुआ...'. तसेच निखतने फॅन मूव्हमेंट या हॅशटॅगचा वापर देखील कॅप्शनमध्ये केला आहे.  या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

  • निखत आणि सलमानचा लूक 

व्हिडीओमध्ये निखत आणि सलमान हे दोघे कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. सलमान हा व्हाईट शर्ट, ब्लॅक पँट आणि ब्लॅक शूज अशा लूकमध्ये दिसत आहे तर निखत ही ब्लू टू पीस आणि व्हाईट शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. 

सलमान खान (Salman Khan) आणि निखत जरीन यांच्या या व्हिडीओमध्ये ते दोघे  'साथिया तूने क्या किया....' हे गाणं रिक्रिएट करताना दिसत आहेत. हे गाणं 1991 मध्ये रिलीज झालेल्या 'लव' या अल्बममधील आहे. 

  • सलमानचे वर्कफ्रंटबद्दल

'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून (Movie) सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'टायगर 3'मध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. त्याचबरोबर शहनाज गिल ते पलक तिवारीसारखे नवे स्टार्स 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT