Salman Khan Birthday Special Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Birthday: सलमानच्या बर्थडे पार्टीला शाहरुख खानसह ‘या’ स्टार्सची हजेरी!

सलमानच्या बर्थडे पार्टीमध्ये अनेक सिनेस्टार्संनी हजेरी लावली होती.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा ‘दबंग' अभिनेता सलमान खान आज आपला 57वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने काल सलमान खानच्या घरी जंगी प्री-बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली होती. यावेळी सगळेच सेलिब्रिटी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते. स्वतः सलमान खान देखील आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह आला आणि त्याने केक कापून पापाराझींचे आभार देखील मानले. या वेळी सलमान खान देखील काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसला होता.

सलमानच्या बर्थडे पार्टीमध्ये तब्बू आणि सई मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. या पार्टीला सलमानची बहीण आर्पिता पती आयुष शर्मा याच्यासोबत एकत्र फोटो पोज देताना दिसली. या सोबतच कार्तिक आर्यन आणि निर्माता रमेश तौरानी देखील या पार्टीत सहभागी झाले. संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सुनील शेट्टी, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा आणि युलिया वंतूर देखील सलमानच्या या जंगी सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.

पण सलमानच्या पार्टीमध्ये आलेल्या शाहरुख खानने सर्वांचे लक्ष वेधले. रात्री उशीराने सलमानच्या घरी पोहोचलेला शाहरुख खान गाडीतून उतरताच थेट आत जाऊन सलमान खानला भेटला. यानंतर दोघांनी एकत्र बाहेर येऊन पापाराझींच्या कॅमेरासाठी फोटो पोज दिल्या. सलमानच्या बर्थडे पार्टीतले हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.

सोशल मीडियावर(Social Media) सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलमान खानला बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू करून आता 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही त्याच्या स्टाईलचे करोडो लोक दिवाने आहेत. लवकरच तो ‘टायगर 3’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT