Salman Khan Juhi Chawla Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Viral Video : "मी जूहीला लग्नासाठी विचारलं होतं पण तिच्या वडिलांनी नकार दिला"...सलमानचा तो व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सलमान खानच्या लग्नाचा विषय कित्येकवेळा चर्चेत असतो आता तो पुन्हा चर्चेत आला आहे...

Rahul sadolikar

अभिनेता सलमान खानने आपल्या स्टाईल आणि अभिनयाच्या जोरावर आपण इंडस्ट्रीचे दबंग असल्याचे सिद्ध केले आहे. सलमानच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या बॅचलर असण्याची जास्त चर्चा केली जाते. सलमान कुठेही प्रमोशनसाठी किंवा कार्यक्रमाला गेला तर त्याला एक प्रश्न विचारला जातो.

57 वर्षांचा सलमान खान या देशातील सर्वात चर्चेत असणाऱ्या बॅचलरपैकी एक मानला जातो. मात्र, सलमान खानने अनेकवेळा आपल्या नात्याबद्दल खुलेपणाने मत मांडलं आहे .

सलमानच्या लग्नाची चर्चा त्याच्या कित्येक मुलाखतींमध्ये झाली आहे. आता अशीच एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ज्यामध्ये सलमान खान जुही चावलाबद्दल बोलताना दिसत आहे. त्याने या मुलाखतीत सांगितले आहे की त्याने जुहीच्या वडिलांना तिचा हात कसा मागितला होता पण दुर्दैवाने तो नाकारला गेला.

त्या जुन्या मुलाखतीचा शॉर्ट क्लिप व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान खान प्रिंटेड निळ्या शर्ट आणि टोपीमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान जुहीबद्दल बोलताना दिसत आहे, ती किती सुंदर आणि गोड होती. तो म्हणतोय, 'मी तिच्या वडिलांना विचारले होते की ते आपल्या मुलीचे माझ्याशी लग्न लावतील का?

'या मुलाखतीत सलमानने जुहीच्या वडिलांच्या लग्नाच्या प्रस्तावावर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दलही सांगितले आहे. जुहीचे वडील म्हणाले होते, 'नाही, मला वाटते की ही जोडी फिट नाही.' जुहीच्या वडिलांनी त्याला का नाकारले, आपल्या मुलीसाठी मुलामध्ये कोणते गुण हवे होते, याचे कारण मला समजले नाही, असे सलमान खान म्हणाला होता.

मुलाखतीत सलमान खान खूपच मनापासून बोलतोय . आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलमान आणि जुहीने एकदाच एकत्र काम केले होते. 

1997 मध्ये रिलीज झालेला 'दीवाना मस्ताना' हा चित्रपट होता, ज्यामध्ये अनिल कपूर आणि गोविंदा देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात सलमान खानची खास भूमिका होती. हा चित्रपट डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT