Salman Khan's New Song
Salman Khan's New Song  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan's New Song : सलमानच्या नव्या गाण्याचा टिजर रिलीज...यादिवशी गाणं पाहता येणार

Rahul sadolikar

सलमान खान आपल्या आगामी 'किसी का भाई किसी की जान'या चित्रपटातील गाण्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रोमँटिक ट्रॅक 'नैयो लगदा', पंजाबी डान्स नंबर 'बिल्ली बिल्ली', 'फॉलिंग इन लव्ह' आणि 'बठुकम्मा'या गाण्यांवर सिनेप्रेमींनी प्रेमाचा वर्षाव केला.

दर्शकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, सलमानने आता हिंदी-तेलुगू फ्युजन असलेले सिनेमातील चौथे गाणे 'येंतम्मा'च्या टिझरचे अनावरण केले आहे.

या टिझरमध्ये सलमान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये दिसत आहेत. हिंदी-तेलुगूचे फ्युजन असलेल्या आणि जानी मास्टर यांनी कोरियोग्राफी केलेल्या 'येंतम्मा'या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत तर, पायल देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तसेच, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायले असून, रफ्तारने रॅप केले आहे.

दरम्यान, गाण्याच्या टीझरच्या शेवटी डान्स फ्लोअरवर सलमान खान आणि व्यंकटेशसोबत एक मिस्ट्री मॅनची एन्ट्री होते. हे पाहून सर्वांना प्रश्न पडला आहे की हा मिस्ट्री मॅन राम चरण तर नाही. याआधी, हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर राम चरण, सलमान आणि व्यंकटेश यांना एकत्र स्पॉट केल्याच्या चर्चा होत्या.

अशी चर्चा आहे की, 'येंतम्मा'हे गाणे सलमान खान, व्यंकटेश, पूजा हेगडे आणि राम चरण यांचा एक डान्स नंबर आहे. 'किसी का भाई किसी की जान'मधील 'येंतम्मा'हे गाणे 4 एप्रिल म्हणजेच उद्या प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT