Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: "आपण नशीबवान आहोत..." बीग बींच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त झाले कलाकार

दैनिक गोमन्तक

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. ते आज आपला ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या ५० वर्षाच्या करिअरमध्ये ते अनेकांसाठी प्रेरणा बनले आहेत. अनेक कलाकारांना त्यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळालेली आहे.

आजही अनेकजण त्यांना आपली प्रेरणा मानून बॉलीवूडमध्ये प्रवेश करतात. आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मोठ्या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत.

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखले जाते तो म्हणजे सचिन तेंडुलकर होय. त्याने आपल्या अनोख्या शैलीत अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कायम तुम्ही केबीसीच्या मंचावर स्पर्धकांना ऑप्शन देता.

आज मी तुम्हाला एका प्रश्नासाठी ऑप्शन देतो असे म्हणत त्याने एक हटके प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो, अमिताभ बच्चन कोण आहे? आणि या प्रश्नासाठी त्याने चार ऑप्शनही दिले आहेत. १. सुपरस्टार, २. आयकॉन, ३. लिजेंड, ४. वरीलपैकी सर्व असे चार ऑप्शन दिले आहेत.

कुमार सानू

'जादुगर' ते 'सूर्यवंशम' पर्यंतच्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चनसाठी गाणे गाणारे प्रसिद्ध गायक कुमार सानू म्हणतात, अमिताभ बच्चन यांनीच मला इंडस्ट्रीत आणले. त्यांच्यामुळेच मी आज गात आहे. 1989 मध्ये आलेल्या जादूगर चित्रपटात( Movie ) मला त्यांच्यासाठी शीर्षक गीत गाण्याची संधी मिळाली तेव्हा ते स्टार होते, तर मी नवखा होतो.

मी अमिताभ बच्चन यांच्यासाठी गातोय हेही मला माहीत नव्हते. मग जेव्हा आम्हाला सांगण्यात आले तेव्हा मी खूप घाबरलो होतो, पण त्याला गाणे आवडले. जादुगरमधल्या त्या गाण्याला त्यांनी हो म्हटलं नसतं तर कदाचित भविष्यात मी गायक होऊ शकलो नसतो. माझ्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्यासाठी गाण्याची संधी मिळणे याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते.

आर बाल्की

'चीनी कम', 'पा' आणि 'शमिताभ' या चित्रपटांमध्ये बिग बींसोबत हॅटट्रिक करणारा दिग्दर्शक आर बाल्की बीग बींना आपला लकी चार्म मानतात. बाल्कीच्या प्रत्येक चित्रपटात बिगचा कॅमिओ असतो.

अमिताभसोबत असलेल्या नात्याबद्दल बाल्की म्हणतात, 'मी त्याचा सर्वात मोठा चाहता आहे. त्‍यांच्‍यासोबत इतके चित्रपट करूनही मी बिग बींसोबतचे माझे नाते एक चाहता आणि स्‍टार म्‍हणूनच पाहतो. मला अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्त्व समजते. तो खूप विनोदी आहे. ते आपल्या भावना उघडपणे जगाला दाखवत नाहीत. त्यांचे चित्रपट बघतच मी मोठा झालो आहे. त्यांच्या चित्रपटातूनच हिंदी शिकलो.

मला त्याची विनोदबुद्धी खूप आवडते. त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी वेगळेपण आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्यांच्या अभिनय आणि माणूस म्हणून असलेले अमिताभ या दोन्ही बद्दल आदर आहे. स्टँडिंग कॉलर शर्ट आणि बेल बॉटम्सचा तो 70 च्या दशकाचा काळ घ्या किंवा आजही ते जे काही करतात ते खूप मस्त वाटतात.

आपण नशीबवान आहोत की आपण अमिताभ बच्चन यांच्या काळात जगत आहोत. तो माझ्यासोबत काम करण्यास तयार झाला हे माझे भाग्य समजतो असे आर बल्कीने म्हटले आहे.

फातिमा सना शेख

फातिमा सना शेखने अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रेरणा मिळत असल्याचे म्हटले आहे. तरुण कलाकारांना त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे. अमिताभ बच्चनसोबत तिचा दुसरा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदूस्तान' करत असलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्या मते, 'बिग बी एक महान व्यक्ती आणि एक अद्भुत कलाकार आहेत. ते एवढे मोठे स्टार आहेत यामागे एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे इतक्या वर्षांनंतरही कामाप्रति त्यांचे असलेले समर्पण आहे.

मला आठवतं, 'ठग्स ऑफ हिंदूस्तान'मध्ये जहाजावर एक सीन होता. ज्यामध्ये ते एकपात्री अभिनय करत होते आणि तो सीन दिवसभर शूट केला जात होता. त्या दिवशी खूप थंडी होती आणि समुद्राचे खारट पाणी पावसासाठी वापरले जात होते, त्यामुळे ते गरम आणि थंड दोन्ही होते.

बिग बींनी सुमारे 15-20 किलो वजनाचे चिलखत घातले होते. जे पावसामुळे आणखी जड झाले होते. असे असूनही त्यांनी एकदाही सांगितले नाही की त्यांना ब्रेक हवा आहे. थंडीने थरथर कापत असतानाही मला थंडी वाजत आहे, आत्ता हा सीन करू नये असे त्यांनी एकदाही सांगितले नाही. हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते असे फातीमा शेख म्हणते.

संपूर्ण बॉलीवूड अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. नुकताच केबीसीच्या मंचावरदेखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सरप्राइज दिले होते. हे सरप्राइज पाहून ते भावूक झाल्याचे प्रोमोमध्ये दिसले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT