Rubina Dilaik goa holiday  Instagram
मनोरंजन

Goa Vacation: रुबीना दिलैक कुटुंबियांसह गोव्यात करतीय हॉलिडे एन्जॉय

बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक सध्या गोव्यात कुटुंबियांसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

दैनिक गोमन्तक

टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) सध्या कौटुंबियांसह गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती सोशल मीडियावर नेहमी तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर करत असते. सध्या रुबीना गोव्यात (Goa) आहे आणि कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने शेअर केलेले हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये (Photo) रुबीना दिलीकसोबतच्या कुटुंबाचे सुपर क्यूट बॉन्डिंग दिसून येत आहे.

टीव्ही सीरियल 'छोटी बहू' फेम रुबीना दिलैकने सोशल मिडियावर फॅमिली फोटो (Photo) शेअर केला आहे. ती सध्या गोव्यात (Goa) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये रुबीना दिलैक आणि तिचे पालक आणि अभिनव शुक्ला दिसत आहेत. रुबीनाची बहीण ज्योतिका दिलैक आणि तिचा मंगेतर देखील फोटोमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करताना रुबीना दिलैकने फोटोखाली लिहिले की, 'आयुष्यात तुम्ही कुठेही फिरायला जाणार असाल ... तर नेहमी तुमच्या कुटुंबाला सोबत घेऊन जा.' या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बिग बॉस 14 मध्येच रुबीनाने खुलासा केला होता की काही वर्षांतच त्यांच्यामध्ये वाद होत असल्याने तिने अभिनवपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्याने नॅशनल टीव्हीवर असेही सांगितले होते की बिग बॉसच्या माध्यमातून त्यांना एकमेकांना वेळ द्यायचा आहे. जेणेकरून नात्यामध्ये सुधारणा होतील. काही काळासाठी, रुबीना आणि अभिनवने एकमेकांना आधार देण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांच्या नात्यामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT