RRR release Vijayawada theatre owner knocked thousands of nails in front of silver screen Dainik Gomantak
मनोरंजन

'RRR' रिलीज होण्याआधीच थेटरच्या मालकाने रूपेरी पडद्यापुढे ठोकले हजारो खिळे

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथिल 'अन्नपूर्णा कॉम्प्लेक्स' या थिएटरचा हो फोटो आहे.

दैनिक गोमन्तक

आजचा दिवस सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे, कारण आज शुक्रवारी, बिग बजेट, मोस्ट अवेटेड चित्रपट 'RRR' (RRR) एकाच वेळी देशभरात रिलीज झाला आहे. 'बाहुबली'चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटाबाबत गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्याचवेळी, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सिनेमा हॉलमध्ये स्क्रीनसमोर हजारो खिळे ठोकलेले दिसत आहेत. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले! या व्हायरल फोटोचे संपूर्ण सत्य काय आहे हे जाणून घेवूया....

विजयवाडा थिएटरचा फोटो

खरंतर हा चित्रपट पाहण्याची लोकांची क्रेझ जोरात आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे सर्वत्र गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रुपेरी पडद्यासमोरील जागेत हजारो खिळे ठोकलेले दिसत आहेत. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथिल 'अन्नपूर्णा कॉम्प्लेक्स' या थिएटरचा हो फोटो आहे. हा फोटो थेटरच्या अधिकृत ट्विटर हॅंन्डलवरून शेअर करण्यात आला आहे.

या फोटोमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की स्क्रीनच्या अगदी समोरच्या रिकाम्या जागेत अनेक खिळे टाकण्यात आले आहेत. यासोबत तेलुगू भाषेत मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे – धोका. दक्षिण भारतात सिनेमाप्रेमी अनेकदा या ठिकाणी चढतात आणि गाणे सुरू असताना नाचतात देखील. एवझेच नाही तर या ठिकाणी आरती करून धूप अगरबत्ती देखील लावली जाते. ज्यामुळे अनेकदा आगीसारखे अपघातही घडले आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सिनेमागृहाच्या मालकाने हे पाऊल उचलले आहे. आता थिएटर मालकाच्या या कारवाईची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अजय देवगण आणि आलियाची खास भूमिका

या चित्रपटात मुख्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर NTR मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण, आलिया भट्ट आणि ऑलिव्हिया मॉरिस व्यतिरिक्त स्टार-स्टडेड लाइनअप आहे, तर समुथिरकानी, रे स्टीव्हन्सन आणि अॅलिसन डूडी सहाय्यक भूमिकेत दिसणार आाहेत. पेन स्टुडिओच्या जयंती लाल गडा यांनी संपूर्ण उत्तर भारतात डिस्ट्रिब्यूटिंग राइट्स संपादन केले आहेत आणि सर्व भाषांसाठी जगभरातील इलेक्ट्रॉनिक अधिकार देखील विकत घेतले आहेत. पेन मरुधर हा चित्रपटा उत्तर प्रदेशात डिस्ट्रीब्यूट करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

SCROLL FOR NEXT