Fitoor Song From Shamshera Screenshot
मनोरंजन

VIDEO: 'शमशेरा' चित्रपटातील 'फितूर' गाण्यात रणबीर-वाणीची रोमँटिक केमिस्ट्री

रणबीर आणि वाणीचा रोमान्स पाहून तुम्हालाही तुमचं प्रेम आठवेल. हे एक रोमँटिक गाणे आहे जे अरिजित आणि नीती मोहन यांनी गायले आहे

दैनिक गोमन्तक

रणबीर कपूर (Ranbir Kapoor), वाणी कपूर (Vaani Kapoor)) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचा 'शमशेरा' चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या रणबीर आणि वाणी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर आणि 'जी हुजूर' या पहिल्या गाण्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. आता 'शमशेरा'चे दुसरे गाणे 'फितूर'ही रिलीज झाले आहे. या गाण्यातील रणबीर आणि वाणीची केमिस्ट्री पाहून तुम्हालाही तुमचं प्रेम आठवेल. हे एक रोमँटिक गाणे आहे जे अरिजित सिंग आणि नीती मोहन यांच्या युगल स्वरात प्रेक्षकांसाठी प्रदर्शत झाले आहे. (Fitoor Song From Shamshera)

शमशेराचे दुसरे गाणे रिलीज

'फितूर' हे गाणे संपूर्णपणे रणबीर कपूर आणि वाणी कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. हे 3 मिनिटे 24 सेकंदाचे गाणे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या गीताच्या शब्दाने आणि चित्रीकरणाने खिळवून ठेवेल. हे गाणे ऐकल्यानंतर सर्वांना पुन्हा एकदा अरिजित सिंगच्या आवाजाचे वेड लागले आहे. हे गाणे मिथुनच्या संगीत संयोजनात गायले आहे.'फितूर'पूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील 'जी हुजूर' हे गाणेही लोकांना आवडले होते.

फितूर या गाण्यात रणबीर-वाणीची रोमँटिक केमिस्ट्री

'शमशेरा' चित्रपटात रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आणि वाणी कपूर या चित्रपटात सोना या डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. वाणी आणि रणबीरची केमिस्ट्री पहिल्यांदाच चित्रपटाच्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या जोडीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. वाणी कपूर, रणबीर कपूर, संजय दत्त व्यतिरिक्त या चित्रपटात आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, रोनित रॉय आणि त्रिधा चौधरी देखील दिसणार आहेत. शमशेरा 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT