Rocky Aur Rani Kii Prem Kahaani  
मनोरंजन

Dharmendra Shabana: रणवीर, आलिया नव्हे धर्मेंद्र आणि शबाना यांच्या लिपलॉक सीनची चर्चा अधिक, धर्मेंद्र यांचे भन्नाट उत्तर

चित्रपटापेक्षा सध्या धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉकचा सीन जास्त चर्चेत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण, चित्रपटापेक्षा सध्या धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉकचा सीन जास्त चर्चेत आहे.

या सीनवरून धर्मेंद्र यांना खूप ट्रोल केले जात आहे. पण त्यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही. वयाच्या 87 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतलेले चुंबन सध्या चर्चेत आहे.

चित्रपटासंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात धर्मेंद्र यांनी लिपलॉकच्या सीनबाबत चर्चा केली. रॉकी और रानी की प्रेम कहानीची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती. यावेळी धर्मेंद्र यांना शबाना यांच्या सोबत चुंबनाबद्दल प्रश्न विचारतात.

"अनेक लोकांनी माझ्या काही सीनबाबत मेसेज आले आहेत, मी त्यांना म्हणालो हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे." असे उत्तर धर्मेंद्र यांनी यावेळी दिली.

दरम्यान, धर्मेंद्र यांनी या सीनबद्दल यापूर्वी चित्रपटात या सीनची गरज होती. असे सांगितले आहे. धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तसेच, त्यांच्या आणि शबानाच्या किसिंग सीनमुळे लोक खूप आश्चर्यचकित झाले आहेत. यासोबतच काही लोक त्याची प्रशंसा करत आहेत. लोकांना आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती असे मला वाटत होते, त्यामुळेच अशा प्रतिक्रिया येत असल्याचे धर्मेंद्र म्हणाले.

"मी शेवटच्या वेळी 'लाइफ इन अ मेट्रो'मध्ये नफिसा अलीसोबत किसिंग सीन केला होता. त्यावेळी लोकांनी त्याचे कौतुक केले. असेही धर्मेंद्र म्हणाले.

चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे दोन विभक्त प्रेमी युगुल म्हणून दाखवले आहेत. जे खूप वर्षांनी एकमेकांना भेटतात. जेव्हा करण जोहरने त्याला चित्रपटातील या सीनबद्दल सांगितले तेव्हा त्याला समजले की हा सीन चित्रपटासाठी आवश्यक आहे. असे धर्मेंद्र म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT