Rocky Aur Rani ki Prem kahani: 'करण जोहर' दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार 'आलिया भट्ट' आणि 'रणवीर सिंह' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
आत्तापर्यत रिलिज झालेल्या गाण्यांनी आणि टीझरने प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. आता चित्रपट थिएटरमध्ये येण्यापूर्वी 25 जुलैला स्क्रिनिंग ठेवले होते. यावेळी बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. स्क्रिंनिग जरी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे असेल तरी चर्चा मात्र जया बच्चन यांची होताना दिसत आहे.
समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये रॉकी और रानी की प्रेम कहानी च्या स्क्रिनिंगवेळी जया बच्चनदेखील श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत हजर राहिलेल्या दिसून आल्या. मात्र पापराजींनी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी एकच कल्ला केला तेव्हा जया बच्चन संतापलेल्या दिसून आल्या. 'थोडं हळू बोला मी बहिरी नाही' असं बोलताना त्या दिसून येत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर सोशल मिडिया( Social Media)वर आता जया बच्चन यांची तुलना रेखा यांच्याबरोबर होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्या वागण्यावर टीका करताना रेखा यांचे कौतुक केले आहे.
एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'आम्ही रेखावर प्रेम करतो कारण त्यांच्यामध्ये असा कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा अॅटीट्युड नाही.' दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, 'जया बच्चन एकदम शाळेच्या मुख्याध्यापिकेसारखे वागत आहेत.'
दरम्यान, करण जोहरने एक खास पोस्ट शेअर करत लिहिले आहे, सात वर्षांनंतर पुनरागमन करतो आहे. माझ्या सिनेसृष्टीतील प्रवासात मला एकापेक्षा एक चांगल्या कलाकारांसोबत काम करता आले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे कथानक वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी-परंपरांच्या मुळाशी जाणारे आहे. या चित्रपटाचे संगीतदेखील उत्तम आहे.
आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्याशिवाय रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात धर्मेंद्र ,जया बच्चन, शबाना आजमी, अर्जुन बिजलानी, श्रद्धा आर्या, श्रिति झा, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, अर्जित तनेजा, नमित दास देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहेत.
2021 मध्ये घोषणा करण्यात आलेला हा चित्रपट 28 जुलैला चित्रपटगृहात रिलिज होणार आहे. आता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.