Rocky Aur Rani Prem Kahani Dainik Gomantak
मनोरंजन

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection Day 5: 'रॉकी और राणी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या पाच दिवसांत कोटिच्या कोटी उड्डाणे

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Collection: काहींनी हा चित्रपट डेली सोपचा भाग असल्याचे म्हटले आहे तर काहींनी हा चित्रपट समाधानकारक असल्याचे म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट आणि प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. आता पाच दिवसांत या चित्रपटाने किती कलेक्शन केले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसुन येत आहे.

चित्रपटाची सुरुवात अपेक्षेपेक्षा थोडी कमी झाली असली तरी शुक्रवारी पहिल्या दिवशी सुमारे 11.1 कोटी रुपये कमावले असून दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी करण जोहरच्या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे.

शनिवारी 16.05 कोटी चित्रपटाने कमावले तर रविवारी चित्रपटाने 18.75 कोटींचा आकडा गाठला. आतापर्यंत या 5 दिवसांत चित्रपटाने 60.17 कोटींची कमाई केली आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी या चित्रपटाने आणखी 40 कोटी रुपये कमावण्याची गरज आहेत.

गली बॉयनंतर आलिया आणि रणवीर रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त केमिस्ट्री रंगवताना दिसत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.

काहींनी हा चित्रपट डेली सोपचा भाग असल्याचे म्हटले आहे तर काहींनी हा चित्रपट समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. करण जोहर ( Karan Johar)ने रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

आलिया आणि रणवीर सिंगसोबतच जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे दिग्गज कलाकारदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसत आहेत. चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन मोठा गाजला असून त्यावर चर्चा होताना दिसत आहेत.

दरम्यान, रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला 10 ऑगस्टपर्यंत कमाईची चांगली संधी आहे. कारण 11 ऑगस्टला सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'OMG 2' चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असल्याचे सोशल मिडियावर दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT