Rocky Aur Rani Prem Kahani Dainik Gomantak
मनोरंजन

RARKPK Box Office Collection: 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; तब्बल इतक्या कोटींची केली कमाई

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Puja Bonkile

RARKPK Box Office Collection: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 28 जुलैला रिलीज झाला आहे.

या चित्रपटाने  पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्यानंतर या चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी 'ने रिलीजच्या 7व्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया.

  • ' रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने 7 व्या दिवशी कमाई

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील आलिया आणि रणवीरची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

यासोबतच 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' बॉक्स ऑफिसवरही धुमाकुळ घालत करत आहे. या सगळ्यात आता चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

सकनिल्‍कच्‍या अहवालानुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ने गुरुवारी रिलीजच्‍या 7व्या दिवशी 6.50 कोटींचा बिझनेस केला आहे.

याआधी बुधवारी चित्रपटाची कमाई 6.9 कोटी रुपये होती. यासह रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटाची एकूण कमाई आता 73.62 कोटींवर गेली आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने 7 दिवसांत 70 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्याता आहे.

त्यामुळे चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चांगले कलेक्शन केले तर तो 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याची शक्याता आहे.

  • रोमँटिक कॉमेडी चित्रपट

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओ यांनी केली आहे.

स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर रणवीर-आलियाशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील चित्रपटात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दिमाखात होणार St. Francis Xavier Exposition, येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत कामे लागणार मार्गी; मुख्यमंत्र्यांची माहिती

Goa Live Updates: माजी क्रिकेटपटू आशिष नेहराचे एनडीझेड भागात अनधिकृत रस्ते बांधकाम; पंचायतीने बजावली नोटीस

गोवा शासनात नोकरी मंत्री-आमदाराच्या 'मेहेरबानी'ने की उमेदवाराच्या 'गुणवत्ते'वर?

Ashish Nehra: आशिष नेहराला धक्का; केळशी पंचायतीने पुन्हा बजावली नोटीस

आपल्या सुंदर, ‘सोबीत’ गोव्याला प्रदूषणरहित ठेवणे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे

SCROLL FOR NEXT