Review of 83 by Anushka Sharma and Virat Kohli

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने दिला '83'चा Review

एक काल्पनिक चित्रपट तुम्हाला 1983 च्या विश्वचषक स्पर्धेच्या घटनेतील भावनांमध्ये घेवून जातो.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड (Bolltwood) अभिनेता रणवीर सिंगची (Ranveer Singh) मुख्य भूमिका असलेल्या '83' या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींकडून भरभरून दाद मिळाली आहे. आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनीही चित्रपट पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही सेलिब्रिटींनी 1983 च्या वर्ल्ड कप ड्रामा '83'चे (83 Film) जोरदार कौतुक केले आहे.

विराटने चित्रपटाचे कौतुक केले

विराटने (Virat kohli) आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगले चित्रण करता येणार नाही. एक काल्पनिक चित्रपट तुम्हाला 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील घटना तुम्हाला भावनांमध्ये घेवून जातो. सगळ्याच कलाकारांनी चित्रपटात उत्तम अभिनय केला होता. 1983 चा विश्वचषक विजय हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा क्षण आहे.

अनुष्काला रणवीरचा अभिनय आवडला

अनुष्कानेही (Anushaka Sharma) या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत रणवीर सिंगच्या जबरदस्त अभिनयाबद्दल सांगितले. ती म्हणाली, '83 हा भारताच्या क्रीडा इतिहासातील एक जादुई क्षण आहे. संपूर्ण संघाने तो सुंदरपणे जिवंत केला. नव्या पिढीसाठी हा चित्रपट अनेक गोष्टींची माहिती देणारा आहे.

चित्रपटात दिसले हे स्टार्स

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, एमी विर्क, हार्डी संधू, साकिब कुरेशी, बोमन इराणी आणि पंकज त्रिपाठी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT