Restoration of first Konkani film Dainik Gomantak
मनोरंजन

पहिल्या कोंकणी चित्रपटाचे रेस्टोरेशन

‘कोकणी चलचित्र’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे आज कोकणी चित्रपटसृष्टीच्या संदर्भात महत्त्वाचा दस्तावेज ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

सन 1950 साली बनल्या गेलेल्या ‘मोगाचो आवडो’ या पहिल्या सिनेमापासून अलीकडच्या काळापर्यंत बनवल्या गेलेल्या साऱ्या कोकणी सिनेमांची माहिती संकलित करून इजिदोर दांतासने कोकणी चित्रपटांंसंबंधित एक अत्यंत महत्त्वाचे कार्य करून ठेवले आहे. ‘कोकणी चलचित्र’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे आज कोकणी चित्रपटसृष्टीच्या संदर्भात महत्त्वाचा दस्तावेज ठरला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ‘मोगाचो आवडो’ या पहिल्या कोकणी चित्रपटाचे निर्माते अल जेरी ब्रागांझा यांचे एक नातेवाईक इजिदोरसाठी एक भेट घेऊन आले.

ही भेट होती ‘सुखाचो आवडो’ या चित्रपटाचे एक रीळ. रीळ अतिशय वाईट अवस्थेत होते. पण त्याचे ऐतिहासिक महत्व ओळखून इजिदोरने ते आपल्यापाशी ठेवून घेतले. इजिदोर ते रीळ घेऊन पुण्यातल्या ‘नॅशनल फिल्म अर्कायव्ह ऑफ इंडिया’या संस्थेत गेला. त्या रिळाच्या रिस्टोरेशनच्या शक्यतेचा अंदाज तो घेत होता पण त्यांनी इजिदोरला सांगितलं की, हे रीळ रिस्टोअर करणे शक्य नाही. त्या रिळाचे पुढे काय करायचे हे न कळून इजिदोर, त्याचा एक मित्र बार्डरॉयला जाऊन भेटला. बार्डरॉय स्वत: एक फिल्ममेकर होता. बार्डराॅयने इजिदोरची गाठ शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांच्याशी घालून दिली.

शिवेंद्र या रिळाचे पुनरुद्धार करण्यात यशस्वी झाला. शिवेंद्र त्याबद्दल सांगताना म्हणतो, ‘त्या रिळाची अवस्था इतकी वाईट होती की, त्यावर केलेल्या प्रक्रियेला ‘रिस्टोरेशन’ म्हणायच्या ऐवजी ‘रिकन्स्ट्रक्शन’ म्हणावे लागेल. रीळ इतक्या ठिसूळ अवस्थेत होतं की, ते अगदी लगदा बनले होते आणि माझ्याकडे ते एका वर्तमानपत्राच्या पेपरात गुंडाळून आले. शिवेंद्रच्या ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ने नंतर त्या सिनेमाच्या रिस्टॉरेशनची जबाबदारी स्विकारली. 2015 सालापासून फाऊंडेशनला त्यासाठी सतत ब्रागांझा कुटुंबियांकडे पाठपुरावा करावा लागला.

‘शेवटी हल्लीच सॅम ब्रागांझा यांनी (जे अल जेरी ब्रागांझा यांचे आजे-पणतू आहेत) ‘मोगाचो आवडो’ या पहिल्या कोकणी चित्रपटाची रिळे आमच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. ही सारी रिळे त्यांच्या घरी, गेली 50 वर्षे दमट वातावरणात, वाईट पध्दतीने पडून होती.’’ फाऊंडेशनच्या प्रयत्नाला नाचू या ‘कुंपासार’ या कोकणी चित्रपटाचे दिग्दर्शक बार्डरॉय बार्रेटो यांंची साथ लाभली. बार्डरॉयने ब्रागांझा कुटुंबियांशी बोलून फिल्मची रिळे फाऊंडेशनला मिळवून दिली.

शिवेंद्र म्हणतात, त्यांच्या फाऊंडेशनपाशी ‘रिस्टोरेशन’च्या तंत्रात पारंगत असलेली प्रशिक्षित माणसे आहेत. पण खूप काम बाकी आहे आणि हे काम नक्कीच दीर्घ आणि कटकटीचे असेल. पूर्ण चित्रपट ‘रिस्टोर’ होऊ शकेल की नाही हे सांगणे या क्षणी तरी कठीण आहे. फाऊंडेशनचे प्रयत्न यशस्वी होऊन ‘मोगाचो आवडो’ हा सिनेमा मूळ स्वरूपात गोमंतकीयांंना पहायला मिळाला तर तो आपोआपच एक रोमहर्षक इतिहास ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT