Ram Gopal Varma Viral Video |Ram Gopal Verma | Ashu Reddy  Dainik Gomantak
मनोरंजन

Ram Gopal Varma Viral Video: राम गोपाल वर्माने अभिनेत्रीसोबत केले असे काही... लोक म्हणाले लजास्पद!

एकेकाळी गंभीर विषयांवर चित्रपट करणाऱ्या राम वर्मा यांचे हे रूप पाहून लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Pramod Yadav

Ram Gopal Varma Viral Video: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात. वर्मा यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राम गोपाल वर्मा एका अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे. राम गोपाल वर्माचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकेकाळी गंभीर विषयांवर चित्रपट करणाऱ्या राम वर्मा यांचे हे रूप पाहून लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा जमिनीवर बसून आपल्या चित्रपटातील अभिनेत्रीच्या पायाची मालिश करत त्याचे चुंबन घेताना दिसत आहेत. यादरम्यान अभिनेत्री सोफ्यावर बसलेली आहे तर रामू जमिनीवर बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केला आहे. राम गोपाल वर्मा यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. वर्मा त्यांच्या आगामी 'डेंजरस' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या प्रमोशनची वापरलेली पद्धत कोणालाच आवडलेली नाही. या व्हिडिओवरून वर्मा यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनची वापरलेली पद्धत लजास्पद आहे असे एका युजरने म्हटले आहे.

Ram Gopal Verma | Ashu Reddy

राम गोपाल वर्मा यांना सत्या, कंपनी, सरकार, शूल आणि रक्त चरित्र यासारख्या चित्रपटांसाठी बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. भारतातील गँगवॉर त्यांनी चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या सत्या या चित्रपटाला 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT