Malvika Raaj Dainik Gomantak
मनोरंजन

K3G मधील 'पू' आठवतेय ? स्क्वाड चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार

'कभी खुशी कभी गम मधील 'पू' चाहत्यांच्या पून्हा भेटीला

दैनिक गोमन्तक

धर्मा प्रोडक्शन प्रस्तुत 2001 मध्ये पारिवारिक कुटुंबावरती आधारित 'कभी खुशी कभी गम' चित्रपटामध्ये करीना कपूरच्या धाकट्या बहीनचा रोल साकारणारी मालविका राज (Malvika Raaj), पू (poo) सध्या Zee5 च्या 'स्क्वाड' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसुन येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेन्झोन्ग्पा यांचा मुलगा रिनझिंग डेन्झोन्ग्पा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसुन येणार आहे.

मालविकाने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवरती स्क्वॉडचे पोस्टर शेअर केले, त्यात रिनझिंग ठळकपणे दिसून येत आहे. यावेळची लढाई भारताची नसून भारताच्या मुली साठी आहे ('इस बार लडाई देश के लिए नहीं, देश की बेटी के लिए है') असा संदेश देताना दिसून येणार आहे. भारत कायम त्याच्या अभिमानासाठी लढताना दिसून येतो. 1 नोव्हेंबरला स्क्वाड (SQUAD) चा ट्रेलर रिलीज होणार आहे. #SquadOnZee5 #squad असे मालविकाने पोस्टरला कॅप्शन दिले आहे.

नीलेश सहाय यांच्या निदर्शनाखाली हा चित्रपट दिग्दर्शित करण्यात येणार आहे, स्क्वॉड हे देशाच्या विशेष लढाईसाठी फिरत असते आणि त्याच्या केंद्रस्थानी एक लहान मुलगी आहे जिने तिच्या आयुष्यात प्रत्येकजण गमावला आहे. चित्रपटामध्ये पूजा बत्रा, मोहन कपूर आणि अमित गौर भूमिका साकारताना दिसणार आहेत.

स्क्वाड हा चित्रपट झी स्टुडिओ आणि इंडियन मीडिया एंटरटेनमेंट निर्मित असणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.

रिनझिंग यांनी एका निवेदनात स्क्वॉड चित्रपटाचे शूटिंग करताना त्यांच्यासमोरील आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले आहे. आम्ही चित्रपटा दरम्यान सर्व गोष्टी जवळुन पाहिल्या आहेत. महामारीने जगाला विळखा घातलेला असताना साथीच्या आजारादरम्यान सर्व निर्बंधांचे पालन करुन आम्ही शुटींग संपवले आहे. हा माझा पहिला चित्रपट आहे त्यामुळे मला अभिमान वाटत आहे आणि नीलेशसोबत काम करणे ही माझ्या साठी सन्मानाची गोष्ट आहे.

रिंझिंगचा जवळचा मित्र असलेला टायगर श्रॉफने देखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्याचे अभिनंदन केले आहे. 'व्वा, वेडा दिसतोय भाऊ' अभिनंदन @rinzingd.' दिशा पटानीनेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर स्क्वॉडचे पोस्टर शेअर करत लिहीले की, 'प्रतीक्षा करू शकत नाही', @rinzingd, लुकिंग किलर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT