Release Date of 'Singham 3' has come up Dainik Gomantak
मनोरंजन

'सिंघम 3' ची रिलीज डेट आली समोर

अजय देवगणचा आगामी चित्रपट 'Singham 3' .

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड (Bollywood) चा सुपर स्टार अजय देवगणचा (Ajay Devgan) आगामी चित्रपट सिंघम 3 (Singham 3) हा असून हा चित्रपट 2023 च्या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याची माहिती रोहित शेट्टीने दिली दरम्यान रोहित शेट्टी त्याचा आयर्न मॅन अजय देवगणसोबत कॉप युनिव्हर्सच्या सिक्वेलवर काम करण्यासाठी सज्ज आहे. अजय देवगणचा पुढचा चित्रपट 'सिंघम ३' हा असणार आहे.

या चित्रपटाचे कनेक्शन यावेळी पाकिस्तानशी असणार आहे. चित्रपटात सिंघम पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवादी संघटनांचा पर्दाफाश करेल. नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार, रोहित शेट्टीने 'सिंघम 3' स्टार ची रिलीज डेट लॉक केली असून, एका अहवालानुसार, हा चित्रपट 2023 च्या स्वातंत्र्य दिना दरम्यान वीकेंडला मोठ्या पडद्यावर येईल. हा एक देशभक्तीपर चित्रपट असेल, ज्यामध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगणची जोडी एकत्र काम करणार आहे. भारत-पाक संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट असून, निर्माते काश्मीर आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे शूटिंग करण्याचा विचार करत आहेत.

सध्या चित्रपटाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत. "चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सप्टेंबर/ऑक्टोबरच्या आसपास सुरू होईल," असे सूत्राने सांगितले. त्याची रिलीज डेट आणि शूटिंग शेड्यूल लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाईल.

रोहित आणि त्याची लेखकांची टीम गेल्या काही काळापासून 'सिंघम 3' च्या कल्पनेवर काम करत आहे. नुकताच रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 27 कोटींची कमाई केली आहे. 'सिंघम ३'वर काम सुरू करण्यापूर्वी रोहित शेट्टी रणवीर सिंगच्या 'सर्कस'चे दिग्दर्शन करत आहे. सर्कसमध्ये रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT