Rekha Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha Birthday: अमिताभ बच्चन यांच्याशिवाय 'या' दोन अभिनेत्यांबरोबर जोडले जाते रेखाचे नाव

Rekha Birthday: असेही म्हटले जाते की, त्यांनी गुपचूप लग्नही उरकले होते. मात्र हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

दैनिक गोमन्तक

Rekha Birthday: काही कलाकार नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. त्या अनेक कलाकारांपैकी रेखा आहे. आपल्या सहज अभिनयाने आणि अप्रतिम दिसण्याने तिने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज रेखाचा ६९ वाढदिवस आहे.

उमरो जान, खिलाडियों के खिलाडी, खूनभरी मांग अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिने बालकलाकार म्हणून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. ७० दशकातील पहिली काही वर्षे तिच्या करिअरला अनुकुल ठरली नाहीत.

मात्र १९७८ चा घर हा चित्रपट तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. प्रेक्षकांमध्ये तिची वेगळी ओळख निर्णाण झाली. त्याआधी तिने 'दो अनजाने' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिने एकापेक्षा एक हिट चित्रपटात भूमिका निभावली आहे.

रिलेशनशिप

रेखा तिच्या चित्रपटाशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या रिलेशनशिपमुळेदेखील चर्चेत आहे. विनोद मेहरा यांच्या सोबतच्या नात्याच्या अनेक चर्चा होत्या. असेही म्हटले जाते की, त्यांनी गुपचूप लग्नही उरकले होते. मात्र हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. २०१४ मध्ये एका मुलाखतीदरम्यान, रेखा( REKHA ) ने विनोद मेहरा यांच्याबरोबरच्या लग्नाच्या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले आहे.

जितेंद्र यांच्यासोबतदेखील रेखाचे नाव जोडले जाते. मात्र जेव्हा ती जितेंद्रला भेटली होती तेव्हा त्यांचे शोभा कपूर यांच्याबरोबर लग्न झाले होते. ते डेटिंग करत असल्याचा अफवा पसरल्या होत्या.

याबरोबरच, रेखा आणि अमिताभ बच्चन( amitabh Bachchan ) यांचे नातेही चांगलेच गाजले. आजही त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळताना दिसते.

त्यानंतर रेखाने दिल्लीतील बिझनेसमॅन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसात निधन झाले आहे. आता रेखा चित्रपटात दिसत नसली तरी तिच्या ग्लॅमरस लूकची नेहमीच चर्चा होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT