Ajay Devgan Dainik Gomantak
मनोरंजन

RED 2: इलियाना डिक्रूजऐवजी 'रेड 2' चित्रपटात अजय देवगण बरोबर कोणत्या अभिनेत्रीची लागली वर्णी

दैनिक गोमन्तक

RED 2: अलीकडेच टी-सीरीजने अजय देवगणच्या 'रेड' या हिट चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. ही बातमी ऐकून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अमेय पटनायक पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 'रेड'मध्ये अजयशिवाय इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला यांनी जबरदस्त अभिनय केला होता.

'रेड 2' मध्ये इलियाना डिक्रूजऐवजी वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वाणीने 'शुद्ध देसी रोमान्स', 'चंडीगढ़ करे आशिकी' सारख्या चित्रपटात काम केले आहे. आता या क्राईम ड्रामामध्ये ती अजयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती सेटवर जॉईन झाली असून काही दिवसांत मुंबईत शूटिंग सुरू करणार आहे. अजय आणि वाणी एकत्र स्क्रीन शेअर करण्याची पहिलीच वेळ असणार आहे.

आता इलियाना डिक्रूजऐवजी वाणी कपूरची आणि अजय देवगणची जोडी प्रेक्षकांना भूरळ घालण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2024 मध्ये अजय देवगण अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तो अभिषेक कपूरच्या पीरियड ड्रामा सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे काय नाव असणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याशिवाय तो विकास बहलच्या सुपरनॅचरल थ्रिलरमध्येही आहे. तो नीरज पांडेच्या 'और में कहाँ दम था' मध्ये दिसणार आहे. सध्या तो रोहित शेट्टीच्या सिंगम अगेन या चित्रपटातदेखील दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT