Rashmi Desai Dainik Gomantak
मनोरंजन

Rashmi Desai: अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Rashmi Desai: मात्र तुमच्याकडे जे काही आहे आणि जे काही नाही त्याबद्दल आदर करा असे रश्मीने आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Rashmi Desai: बिग बॉस 13' आणि 'उत्तरन' फेम रश्मी देसाई सध्या टीव्हीवर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिथे ती तिच्या पोस्ट शेअर करत असते. कधी ती तिच्या फोटोंच्या माध्यमातून तर कधी रीलच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो त्याने X वर शेअर केला आहे आणि ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

X वर व्हिडिओच्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांशी ट्रोल करणाऱ्यांशी संवाद साधला आहे. जे बेरोजगार लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की मी काय काय करत आहेत ते मला माहीती आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे वाईट शब्द माझ्या आईवडीलांसाठी वापरु नका. पण जे लोक असे करु शकत नाही तर मला काही फरक पडत नाही, तुम्हाला आनंद मिळो असे रश्मीने म्हटले आहे.

आपल्या चाहत्यांना उद्देशून ती म्हणते आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही सगळे तुमच्या आयुष्यात जे काही करत आहात ते चांगले करत आहात.

रश्मीने ट्वीट करत म्हटले आहे की, मी आयुष्यात पुढे जात आहे. बदल ही एकच गोष्ट सतत आपल्या आयुष्यात असते. काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि काही वेळा आठवणी बनतात. परंतु तुम्ही कोणाच्या भावना दुखावू नका. कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. मात्र तुमच्याकडे जे काही आहे आणि जे काही नाही त्याबद्दल आदर करा असे रश्मीने आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. अशा प्रकारे रश्मीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT