Ranveer Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer Singh:अवॉर्ड मिळाला अन् रणवीरला कोसळले रडू, दीपिकाचा हात धरून म्हणाला...

गोमन्तक डिजिटल टीम

हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या कूल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच, रणवीर सिंगला 67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांतर्गत (Filmfare Award) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब मिळाला. या खास प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग स्टेजवर रडताना दिसत आहे. तसेच, रणबीरने पत्नी दीपिका पदुकोण (Deepika Padukone), कुटुंब आणि चाहत्यांबद्दल बरेच काही सांगितले आहे.

फिल्मफेअर 2022 पुरस्कारात रणवीर सिंगला त्याच्या 83 चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले. याचा एक व्हिडिओ रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर फिल्मफेअर अवॉर्ड घेताना दिसत आहे. मात्र यानंतर रणवीर सिंग भावूक झाला आहे.

रणवीर सिंग म्हणाला, 'आज या मंचावर मला असा पुरस्कार मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.' असे म्हणत रणवीर रडताना दिसत आहे.

रणवीर सिंग पुढे म्हणाला, आज मी जो काही आहे त्यात सर्वात मोठे योगदान माझ्या चाहत्यांचे आहे. यासोबतच माझे आई, वडील आणि बहिणीनेही मला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर माझ्या घरात असलेली लक्ष्मी तिला मी कधीच विसरू शकत नाही. असे म्हणत रणवीर सिंग दीपिका पदुकोणला स्टेजवर घेऊन येत तिला किस करताना व्हिडिओत दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT