Deepika Padukone and Ranveer Singh  Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer Singh: शाहरुखच्या बर्थ-डे पार्टीत रणवीरने 'चलो भी जो हुआ, वो जाने दो...' म्हणत दीपिकासमोर धरले कान

Ranveer Singh: त्यावेळी लग्नाआधीच्या त्यांच्या रिलेशनबद्दल दीपिकाने केलेल्या वक्तव्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल कऱण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Ranveer Singh: बॉलीवूडचा लाडका कलाकार रणवीर सिंग आपल्या अतरंगी स्टाइलसाठी, उत्साहासाठी आणि दर्जेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिकाला केलेल्या ट्रोलिंगमुळे हे जोडपं चर्चेत होते. आता शाहरुखच्या बर्थ-डे पार्टीत रणवीरने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एनर्जीने भरलेल्या रणवीर सिंगनेही शाहरुख खानच्या ५८व्या वाढदिवसाला खूप धमाल केली. गायक मिका सिंगसोबत तो जवळपास डीजे झाला होता. 'जवान', 'पठाण', 'चेन्नई एक्सप्रेस'च्या गाण्यांवर डान्स केला.

शाहरुख खानच्या 'कभी हान कभी ना' या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'आना मेरे प्यार को ना तुम जूता समझो जाना, सनम तुझे पाने का ये सारा बहाना का था...'. या गाण्यावर रणवीर टेबलावर चढला. या गाण्यात आणखी एक ओळ होती, 'चलो भी जो हुआ, वो जाने दो...'. या ओळीवर रणवीरने दीपिकासमोर कान पकडले. यावेळी दीपिकाही डान्स करताना दिसली.

दरम्यान, करण जोहरच्या ८ व्या सीझनमध्ये बॉलीवूडच्या या प्रसिद्ध जोडीने हजेरी लावली होती. त्यावेळी दीपीकाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील याबरोबरच रणवीर आणि तिच्या नात्याविषयी काही खुलासे केले होते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.

काय म्हणाली दीपीका?

लग्नाआधी रणवीर आणि मी एका कॅज्युअल रिलेशन( Relationship )मध्ये होतो. त्याआधी मी ज्याप्रकारच्या नात्यात होते, त्यातून बाहेर येण्यासाठी मला वेळ हवा होता. मला काही काळ कोणालाही कोणतेही वचने द्यायची नव्हती.

त्यामुळे रणवीर( Ranveer Singh )ला मी कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती. जोपर्यंत मला रणवीरने मला प्रपोज केले नव्हते तोपर्यंत आम्ही कॅज्युअल रिलेशनमध्ये होतो. पण मला या सगळ्यात मजा आली, आनंद मिळाला. असे दीपीका( Deepika Padukone ) ने म्हटले होते. आता दीपीकाचे हे म्हणणे किंवा वागणे अनेकांना पसंतील पडले नाही. नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT