Rani Mukherji On OTT
Rani Mukherji On OTT Dainik Gomantak
मनोरंजन

Rani Mukherji On OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील महिलांच्या भूमिकेविषयी राणी मुखर्जी म्हणाली, 'महिलाप्रधान चित्रपट...'

दैनिक गोमन्तक

Rani Mukherji On OTT: बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या अभिनयाबरोबरच प्रभावी व्यक्तीमत्वासाठीदेखील ओळखली जाते.

राणी मुखर्जीने एकापेक्षा एक हीट चित्रपटात अभिनय करत चित्रपटसृष्टीत महत्वाचे योगदान दिले आहे. मात्र चित्रपटात अभिनय करण्याशिवाय राणीला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायलादेखील आवडतात. इतकेच नाही तर महिलांच्या हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेताना दिसते. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या जगासमोर मांडण्यास राणी मुखर्जीने आवाज उठवला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेल्या वेब सीरीज, चित्रपटातील महिलांच्या भूमिकेला असलेला वाव आणि थिएटरमध्ये रिलिज होत असलेल्या चित्रपटातील महिलांची भूमिकेविषयी राणी मुखर्जीने आपले मत मांडले आहे.

चित्रपटात महिलांना महत्वाची भूमिका मिळायला हव्यात, महिलाप्रधान चित्रपट बनायला हवेत असे मत राणी मुखर्जीने सुरुवातीपासूनच मांडले आहे. महत्वाचे म्हणजे, महिलांनीच हे असे नियम मोडले पाहिजेत असेही राणी वारंवार बोलताना दिसते. आता थिएटरमधील चित्रपटांच्या तुलनेत ओटीटी प्लॅटफॉर्मवर महिलांना जास्त महत्वाची भूमिका मिळत असल्याचे मत राणीने मांडले आहे.

पुढे ती असेही म्हणताना दिसते की, कोणताही प्लॅटफॉर्म जो महिलांसाठी बदलत असतो, तो कायमच बेस्ट असतो. जोपर्यंत स्त्रियांचे काम लोकांपर्यंत पोहचेपर्यंत महिला ते काम बेस्ट करु इच्छित असतात कारण लोक जेव्हा आमचे काम बघतात तेव्हाच आम्हा कलाकारांची प्रगती होत असते. पाच लोकांनी आमचे काम बघावे म्हणून आम्ही काम करत नाही, तर संपूर्ण जगात आमचे काम लोकांनी पाहावे हा आमचा प्रयत्न असतो.

काही चित्रपट हे थिएटरसाठी नसतात. कारण प्रेक्षकांना काही चित्रपट हे त्यांच्या घरी, त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये पाहायला आवडतात. माझी गोष्ट विचारत असाल तर, महिलाप्रधान चित्रपट चित्रपटगृहात आणण्याचा आणि माझ्या प्रेक्षकांना तो चित्रपटगृहातला अनुभव देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. माझा विश्वास आहे, प्रेक्षक महिलाप्रधान चित्रपट चित्रपटगृहात येऊन पाहतील.

राणी मुखर्जीने असेही म्हटले आहे की, जोपर्यंत प्रोड्यूसर थिएटरमधून पैसे कमावू शकतात, तोपर्यंत मी चित्रपटगृहात येणाऱ्या चित्रपटांनाच प्राधान्य देईन.

दरम्यान, 2023 मध्ये आलेल्या 'मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटात राणी मुखर्जी दिसून आली होती. राणी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या दर्जेदार चित्रपटांसाठीदेखील ओळखली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT