Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding News Dainik Gomantak
मनोरंजन

रणबीर कपूर -आलिया भट्टचे एप्रिलमध्ये होणार शुभमंगल?

गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत सोशल मिडियावर चर्चा सुरू होत्या.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर (Social Media) चर्चा सुरू आहेत. रणबीर आणि आलिया या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार असल्याच्या बातम्या पहिल्यांदा आल्या होत्या. मुंबईतील (Mumbai) चेंबूर येथील आरके हाऊसमध्ये त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. पण याबाबत रणधीर कपूर यांना विचारले असता, त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. पण आता रणबीर आणि आलिया एप्रिल महिन्यात लग्न करणार अशी चर्चा सुरू आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding News)

या दोघांचे लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर-आलिया 17 एप्रिल रोजी लग्न करणार आहेत. आलियाच्या (Alia Bhatt) आजोबांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे हे जोडपे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करायचा विचार करत आहेत. "आलियाचे आजोबा एन राझदान यांना आलिया आणि रणबीरचे लग्न बघायचे आहे. 17 एप्रिल रोजी एक अतिशय खाजगी स्वरूपात लग्ना पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होणार आहेत. हे लग्न आरके स्टुडिओमध्ये होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

यापूर्वी रणबीर आणि आलिया राजस्थानमधील उदयपूरमध्ये लग्न करू शकतात, अशी चर्चा होती. कारण उदयपूरला जाताना दोघेही अनेकदा दिसले होते.

* रणबीर-आलिया चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त

रणबीर आणि आलिया दोघेही सध्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. दोघांनी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम केले आहे. याशिवाय आलिया आगामी चित्रपट 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' आणि 'डार्लिंग्स' तर रणबीर 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT