alia bhatt- ranbir kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

अमिताभ बच्चनसह 7 सेलिब्रिटींनी केले आलिया-रणबीरचे अभिनंदन, आज होणार शुभमंगल

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: आलिया-रणबीर की आज 'वास्तु' अपार्टमेंट मध्ये होणार शुभ-मंगल

दैनिक गोमन्तक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या चाहत्यांची उत्सुकता आज संपणार आहे. कारण बॉलिवूडचे हे प्रसिद्ध जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. आलिया-रणबीर मुंबईतील पाली हिल येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये कुटुंबीय आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरू आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांनी जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन यांनीही या जोडप्याला त्यांच्या आयुष्याच्या नवीन वाटचालीच्या दिल्या आहेत. (Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Updates)

* अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील 'केसरिया' या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी यांनी लिहिले आहे की, 'ईशा आणि शिव यांना आमच्या शुभेच्छा... कारण ते येत्या काही दिवसांत खास प्रवास सुरू करणार आहेत. या उत्सवाची सुरुवात टीम ब्रह्मास्त्रने करूया."

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांना 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामधील (Movie) केसरिया या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत अनेक बॉलीवुड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि अयान मुखर्जी, संजय दत्त, करण जोहर, इम्तियाज अली, टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी आणि रुबिना डिलाईक आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ (Video) शेअर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजेच 14 एप्रिल रोजी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईतील 'वास्तु' अपार्टमेंटमध्ये दुपारी 2 च्या सुमारास लग्नाच्या सर्व विधी पार पाडणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT