Alia-Ranbir  Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir- Alia Photo Leak : प्रायव्हेट फोटो लिक प्रकरणी रणबीर- आलिया करणार कायदेशीर कारवाई...

काही दिवसांपुर्वी आलिया भट्टचे काही घरातले काही फोटो व्हायरल झाले होते त्यावर आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे

Rahul sadolikar

काही दिवसांपुर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या घरातले काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. साहजिकच पापाराझींनी हे फोटो त्यांच्या घराबाहेरुन घेतले होते. हे फोटो व्हायरल होताच रणबीर आलिया प्रचंड संतप्त झाले होते. हा आमच्या प्रायव्हसीचा भंग आहे असं ते म्हणाले होते.

या प्रकारानंतर हे प्रकरण शांत झालं असं वाटत होतं पण तसं नाही. आता हे प्रकरण आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता याप्रकरणी आलिया -रणबीर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

याप्रकरणी रणबीर म्हणाला, "हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. तुम्ही माझ्या घराच्या आत शूट करू शकत नाही आणि तिथे काहीही होऊ शकते, ते माझे घर आहे. ते पूर्णपणे अनावश्यक होते."रणबीर पुढे म्हणाला, "आम्ही आता कायदेशीर कारवाई करत आहोत. मला त्याबद्दल जास्त बोलायचे नाही, पण ते खूप वाईट होते." या रणबीरने पापाराझी कल्चरबद्दलही आपलं मत मांडलं आहे.

, "आम्ही पापाराझींचा आदर करतो. मला वाटते की पापाराझी आमच्या संस्कृतीचा भाग आहेत. आम्ही एकमेकांसोबत काम करतो, ते आमच्यासोबत काम करतात, आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. ", पण या प्रकारच्या गोष्टी आम्हाला त्रास देतात आणि लोकांना अशा कृत्यांची लाज वाटते." 

22 फेब्रुवारीला आलिया भट्टने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगण्यासाठी सोशल मीडियावर एक नोट शेअर केली होती. नोटमध्ये तिने म्हटले आहे की, दोन अज्ञात व्यक्तींनी ती तिच्या घरी बसलेली असताना तिचे खाजगी फोटो क्लिक केले, तेही तिच्या संमतीशिवाय. आलियाने एका न्यूज पोर्टलवर आरोप केले आणि फटकारले कारण तिचे फोटो तिच्या संमतीशिवाय घेतले गेले आणि नंतर पोर्टलवर पोस्ट केले गेले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

SCROLL FOR NEXT