Sunil Lahri On Adipurush Dainik Gomantak
मनोरंजन

Sunil Lahri On Adipurush: 'रावणाचा हेअरकट कोहलीसारखा...,' आदिपुरुषच्या मेकर्सला 'लक्ष्मण' ने फटकारले

Sunil Lahri On Adipurush: बॉलिवूड चित्रपट 'आदिपुरुष' सध्या जगभरात कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Manish Jadhav

Sunil Lahri On Adipurush: बॉलिवूड चित्रपट 'आदिपुरुष' सध्या जगभरात कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र या चित्रपटाची जितकी कमाई होत आहे, तितकाच या चित्रपटाबाबत गोंधळ पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील संवाद आणि काही दृश्ये वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. आता रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटात रावण बनलेल्या सैफ अली खानची तुलना त्यांनी क्रिकेटर विराट कोहलीशी केली आहे.

दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सुनील लाहिरी यांनी आदिपुरुष या चित्रपटाविषयी सांगितले. चित्रपटातील पात्रांबद्दल मोकळेपणाने बोलताना ते म्हणाले - राम आणि लक्ष्मण यांच्या पात्रांमध्ये फारसा फरक नाही. दोघेही सारखेच दिसत आहेत. त्यांचे वागणे देखील सारखेच आहे. रावण लोहारासारखा दिसतोय जो लोखंडावर घाव घालताना दिसतो. याची काय गरज होती.

पुढे, या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषा आणि लूकबद्दल बोलताना लाहिरी म्हणाले की - जेव्हा तुम्ही मेघनाथला पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की, त्याने गोंदवले आहे. याशिवाय अनेक पात्रांची केशरचनाही विचित्र दिसत आहे. रावणाचे हेअरकट भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (Virat Kohli) हेअरकट सारखा दिसत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत आहे

चित्रपटाबद्दल (Movie) बोलायचे झाल्यास, आदिपुरुषने रिलीजच्या अवघ्या 4 दिवसांत कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. जगभरात 400 कोटींचा आकडा पार करण्याच्या दिशेने चित्रपटाची वाटचाल वेगाने सुरु आहे.

या चित्रपटात प्रभासने भगवान रामाची भूमिका साकारली असून सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली असून बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT