Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul Preet Singh Wedding: रकुल अन् जॅकी करणार हटके लग्न! कार्बन फूटप्रिंट...

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे, कधी त्यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता बॉलीवूडची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही आपल्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. विवाह समारंभाच्याआधी वराचे घर दिव्यांनी सजवले जाते. आता त्यांच्या घराच्या सजावटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रकुल आणि जॅकीने 2021 मध्ये त्यांच्या नात्याबद्दल इंस्टाग्राम अकाऊंटवर अधिकृत सांगितले होते.आता थायलंडमध्ये मित्र आणि कुटुंबासह बॅचलर ट्रिप केल्यानंतर, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.

या कलाकारांच्या लग्नाच्या आमंत्रणाचे कार्ड एका चाहत्याने १२ फेब्रुवारीला शेअर केले होते. कार्डावर एक फूल काढलेले आहे आणि लग्नाची थीम गुलाबी आणि निळा या रंगाची आहे. निमंत्रणपत्रिकेच्या दुसऱ्या पानावर समुद्रकिनारी एक सुंदर मंडप दाखवला आहे आणि त्यावर लिहिले आहे, 'फेरस, बुधवार, 21 फेब्रुवारी 2024'.

समोर आलेल्या माहितीनुसार, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी इको-फ्रेंडली लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या एका जवळच्या सूत्राने खुलासा केला की दोन्ही कुटुंबांनी कोणतीही निमंत्रण पत्रिका पाठवली नाहीत. रकुल आणि जॅकीने त्यांच्या लग्नात न फटाकेही फोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे म्हणजे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी कार्बन फूटप्रिंट मोजणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यापासून सुरुवात होईल आणि त्यानंतर ते पाऊलखुणाप्रमाणे झाडे लावतील. त्यांच्या लग्नानंतर, रकुल आणि जॅकी त्यांना किती झाडे लावण्याची गरज आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या पायाचे ठसे मोजतील. मग लग्नानंतर दोघेही ते तितकी झाडे लावतील अशी माहीती समोर आली आहे.

कलाकारांनी इको-फ्रेंडली लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT