Rakul Preet-Jackky Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul Preet-Jackky Wedding: आलिया, अनुष्का अन् कियारानंतर रकुल प्रीतचाही लग्नात पिंक लेहेंग्यातील ग्लॅमरस लूक

बॉलीवुड अभिनेत्री रकुल प्रीत आणि चित्रपट निर्माता जॅकी भगनानी यांनी २१ फेब्रुवारीला गोव्यात लग्नगाठ बांधली. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

Puja Bonkile

rakul preet jackky wedding in goa rakul wore designer tarun tahiliani blush pink lehenga watch photo

बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता जॅकी भगनानी यांचे २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा संपन्न झाला आहे. दोघांनीही गोव्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. शिल्पा शेट्टी, वरुण धवन आणि भूमी पेडणेकर यांसारख्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रकुल प्रीतचा खास वेडिंग लूक

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये त्यांचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. लाल, मरून आणि मॅजेंटा रंग सोडून रकुलने पेस्टल शेड्सचा ट्रेंड फॉलो केला. तिच्या खास दिवसासाठी रकुलने तरुण ताहिलियानीच्या कलेक्शनमधून ब्लश पिंक फ्लोरल लेहेंगा घातला होता. लेहेंग्यावर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या बारीक धाग्याचे काम होते. सोबत फुल स्लीव्ह ब्लाउज घातले होते. या लेहेंग्यात ती खूपच छान दिसत होती.

रकुलने लेहेंग्यासोबत खूप भारी नेकपीस घातला होता. त्यासोबत मॅचिंग कानातले आणि मांग टिक्का लावला होता. लाल बांगड्यांऐवजी तिने पीच-टोन बांगड्या घातल्या होत्या. यामुळे तीचा पुर्ण लूक नवा होता.

जॅकी भगनानीचा कसा होता वेडिंग लूक

तर जॅकीने त्याच्या खास दिवसासाठी बेज रंगाची सोनेरी नक्षीदार शेरवानी घातली होती. त्याचा लूक वधूच्या लूकशी अगदी जुळत होता. पगडी, मॅचिंग स्टोल आणि शेरवानी सोबत नेकलेस घातला होता.

लाल रंगाऐवजी आता पेस्टल शेड्स बॉलिवूडचा आवडता रंग बनला आहे. अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा यांच्यानंतर अथिया शेट्टीनेही पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला होता. मात्र, रकुलचा लूक पाहून चाहते फारसे खूश झाले नाहीत. तिच्या लूकला पाहून सुंदर नाही तर बोरिंग लूक म्हणत आहेत. अहवालानुसार रकुल आणि जॅकी मुबंईत रिशेप्शन पार्टी आयोजत करू शकता. पण याची तारिख अद्याप समोर आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT