Raj Kapoor was very strict in terms of work

 

Dainik Gomantak

मनोरंजन

Birth Anniversary: राज कपूर यांच्याबद्दल 'या' खास गोष्टी जाणून घ्या

प्रसिद्ध दिवंगत बॉलिवूडमधील (Bollywood) अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर (Raj Kapoor) यांना त्यांचे चाहते भारताचे चार्ली चॅप्लिन म्हणून ओळखतात.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध दिवंगत बॉलिवूडमधील (Bollywood) अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर (Raj Kapoor) यांना त्यांचे चाहते भारताचे चार्ली चॅप्लिन म्हणून ओळखतात. राज कपूर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील महान शोमन म्हणून इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील या शोमनची आज 97वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी कपूर हवेली येथे झाला, जो आता पाकिस्तानातील पेशावर भागात आहे.

1947 मध्ये आलेल्या 'नील कमल'मध्ये मधुबालासोबत मुख्य भूमिकेत दिसल्याने राज कपूर यांचे सिने उद्योगातील योगदान लक्षात आले. 1948 मध्ये, राज कपूर यांनी वयाच्या 24 व्या वर्षी सर्वात तरुण चित्रपट दिग्दर्शक बनून इतिहास रचला. त्यांनी स्वतःचा स्टुडिओ, आरके फिल्म्स स्थापन केला आणि नर्गिस दत्त, प्रेमनाथ आणि कामिनी कौशल अभिनीत आग या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी, त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात 3 राष्ट्रीय पुरस्कार, 11 फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर लाइफ टाइम अचिव्हमेंट आणि अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. राज कपूर आपल्या कामाबद्दल खूप गंभीर होते. कामाच्या वेळी कामावर आणि मौजमजेच्या वेळी मजा करण्यावर विश्वास ठेवणारे राज कपूर थोडे कडक होते, तेही फक्त कामाच्या बाबतीत. कामाचा विषय आला की समोर दुसरा अभिनेता किंवा दुसरा कोणी माणूस किंवा स्वतःचा मुलगा असल्याचं पाहत नव्हते.

जाणून घ्या राज कपूर ऋषींवर ओरडण्याचे कारण काय होते?

होय, त्याचे उदाहरण म्हणजे खुद्द राज कपूर यांचा धाकटा मुलगा ऋषी कपूर, ज्यांचे गेल्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर किती कठोर होते, याचा उल्लेख खुद्द ऋषी यांनीच ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रात केला आहे. दिलीप कुमार : द सबस्टन्स अँड द शॅडो असे या आत्मचरित्राचे नाव आहे. राज कपूर एकदा ऋषी कपूर त्यांच्यावर वाईट ओरडले कारण ऋषी एका निराश प्रियकराची अभिव्यक्ती कॅमेऱ्यात देऊ शकले नाहीत, ज्या पद्धतीने दिलीप कुमार देत असत. राज कूपर दिग्दर्शित 1982 मध्ये आलेल्या 'प्रेम रोग' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT