Raj Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Raj Kapoor birth Anniversary: 'शो मॅन' च्या पेशावरच्या आठवणी अन् पाकिस्तानी सैनिकांनी दिलेल्या जिलेबी...

..आणि पाकिस्तानी सैनिकांनी जिलेबी देताच राज कपूर भावुक झाले

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेते राज कपूर यांची आज 98 वी जयंती. त्यानिमित्य पाहुया राज कपूर यांचा तो किस्सा ज्यातुन कलाकाराचे प्रचंड सामर्थ्य कळते. हा तो किस्सा आहे ज्यात ते प्रचंड भावुक झाले होते. राज कपूर यांचा जन्म फाळणीपुर्व पाकिस्तानात 14 डिसेंबर 1924 रोजी झाला. पृथ्वीराज कपूर आणि रामसरनी देवी यांना झालेल्या 6 मुलांमध्ये राज सगळ्यात मोठे होते.

राज कपूर यांचे खरे नाव सृष्टीनाथ कपूर असे होते. अत्यंत देखणे असे राज लहानपणापासुन सर्वांचे लाडके होते. आपल्या मुलाने काहीतरी कर्तृत्व गाजवावं असं प्रत्येक वडिलांसारखंच पृथ्वीराज कपूर यांचं स्वप्न होतं आणि राज कपूर यांनी ते खरं करुन दाखवलं. राज कपूर भारतीय सिनेमातले पहिले शो मॅन ठरलेच पण त्याचबरोबर सर्वसामान्य प्रेक्षकांना राज कपूर आपला नायक वाटायचे.

 तीन राष्‍ट्रीय पुरस्‍कार, 11 फिल्‍मफेयर अवॉर्ड, पद्मभूषण, सिनेमासाठी दिला जाणारा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार एवढे सन्मान राज कपूर यांना मिळाले. राज कपूर (Raj Kapoor) यांचा सिनेमा माणुस जोडणारा होता कारण त्यांचे राज यांच्या सिनेमाचा नायक सामान्य माणुस असायचा.

असं म्हणतात कलाकाराला कुठलीही सीमा नसते. राज कपूर यांच्या बाबतीत हे पुर्णता: खरे ठरले. त्याचं कारण म्हणजे भारताबरोबरच पाकिस्तामध्येही राज कपूर यांचे फॅन्स मोठ्या संख्येने होते. हा किस्सा पाकिस्तानच्या सैनीकांनी दाखवलेल्या राज कपूर यांच्यावरच्या प्रेमाचा आहे.

राज कपूर यांचा हा किस्सा बॉबी चित्रपटाच्या शुटींगच्यावेळचा. राज कपूर शुटसाठी कश्मीरला गेले होते. शुट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सीमेवर तैनात सैनीकांंना भेटण्याची ईच्छा व्यक्त केली. भारतीय सैनीकांना हे कळताच त्यांनी राज यांच्यासाठी चहा आणि भजी तयार ठेवली.

राज कपुर आले आणि भारतीय सैनिकांसोबत गप्पा मारत राहिले. इतक्यात पाकिस्तानी रेंजर्सच्या गाड्यांचा एक ताफा बॉर्डरवर पोहोचला. त्यातुन काही सैनिक उतरले. आपण राज कपूर यांना भेटायला आल्याचं पाकिस्तानी सैनिकांनी सांगितलं.

सीमेपारचं हे प्रेम बघुन राज कपूर भारावुन गेले, कारण पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या शो मॅन साठी जिलेबी आणली होती. ती जिलेबी आणि पाकिस्तानी सैनिकांचं प्रेम बघुन नक्कीच राज कपूर आपल्या भुतकाळाच गेले असतील. त्या भुतकाळात जिथं त्यांची पेशावरमधली आलीशान हवेली होती, जिथं त्यांचा जन्म झाला.

असं म्हणतात कलाकार माणुस जोडतो आणि ती ताकद राज कपुर या अवलीया कलाकारात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

SCROLL FOR NEXT