Shaitaan Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Shaitaan Box Office Collection: शैतानने जमवला मोठा गल्ला! प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा देशातील पहिलाच हॉरर चित्रपट

Shaitaan Box Office Collection: देशातील पहिलाच असा हॉरर चित्रपट आहे जो बॉक्स ऑफीसवर हीट होताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Shaitaan Movie Box Office Collection

आर. माधवन आणि अजय देवगण यांचा शैतान हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा चित्रपट फारशी कमाई करु शकणार नाही असे अनेकांनी सुरुवातीला मत व्यक्त केले होते मात्र सर्वांचे अंदाज चूकवत हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तूफान कमाई करत असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, देशातील पहिलाच असा हॉरर चित्रपट आहे जो बॉक्स ऑफीसवर हीट होताना दिसत आहे. शुक्रवारी म्हणजेच ८ मार्चला रिलिज झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसात ५४ कोटींची कमाई केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,'शैतान'च्या कमाईत तिसऱ्या दिवशी 9.33% वाढ झाली आहे. रविवारी या चित्रपटाने 20.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एका दिवसापूर्वी शनिवारी 18.75 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर शुक्रवारी पहिल्या दिवशी 14.75 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. अशा प्रकारे, पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 54.00 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे.

या आठवड्यात हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 60-65 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' आणि अदा खानचा 'बस्तर: द नक्सल स्टोरी' येत्या शुक्रवारी म्हणजेच १५ मार्चला रिलीज होणार आहे, त्याचा 'शैतान'च्या स्क्रीनिंग आणि तिकिटांवर काही परिणाम होणार का हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, 'शैतान'च्या भूमिकेत असलेल्या आर.माधवनच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT