Manny Coto Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Manny Coto Passes Away : जगप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मॅनी कोटो यांचं निधन

निर्माते, दिग्दर्शक मॅनी कोटो यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.

Rahul sadolikar

मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आलीय. '24' या जगप्रसिद्ध मालिकेसाठी एमी पुरस्कार जिंकणारा मॅनी कोटोचे निधन झाले आहे. मॅनीने वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

वृत्तानुसार, मॅनीचा रविवारी त्याच्या पासाडेना येथील घरी मृत्यू झाला. मॅनी बर्याच काळापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते आणि हेच त्यांच्या मृत्यूचे कारण आहे.

मॅनी कोटा आणि नाटक

मॅनी कोटो यांनी फॉक्सचे AI नाटक NeXT याची सह-निर्मिती केली. याशिवाय डेक्सटर, स्टार ट्रेक: एंटरप्राइज, अमेरिकन हॉरर स्टोरी आणि ईतर अनेक सिरीजचे ते निर्माते होते.

मॅनी कोटो यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कुटुंबाच्या वतीने बोलत असलेल्या एका प्रतिनिधीने मॅनीच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की त्याने 13 महिने या कॅन्सरशी लढा दिला. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याचे कुटूंब सोबत होते.

नेक्स्ट मालिकेची निर्मिती

कोटोने शो टाइम मालिका 'ओडिसी 5' तसेच फॉक्स मालिका 'नेक्स्ट' ची निर्मिती केली आहे. त्याने 'डेक्स्टर'च्या शेवटच्या तीन सीझन आणि 'स्टार ट्रेक: एंटरप्राइज'च्या शेवटच्या दोन सीझनमध्येही अभिनयही केलाय.

विशेष गोष्ट म्हणजे कोटो यांनी 1992 च्या 'डॉ.' या सिरीजचे सह-लेखन आणि दिग्दर्शन केलं. कोटोच्या सुरुवातीच्या प्रोजेक्ट्समध्ये ख्रिस्तोफर मॅकडोनाल्ड स्टारर हॉरर थ्रिलर 'प्लेरूम'चा समावेश आहे.

चित्रपट

याशिवाय डॉल्फ लुंडग्रेन स्टारर पॉलिटिकल थ्रिलर 'कव्हर-अप', फॅमिली साय-फाय फिल्म 'स्टार किड' आणि डिस्ने चॅनल फिल्म 'झेनॉन: द जेकिल' अशा सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT