Actress Priyanka Chopra Twitter/@priyankafiles
मनोरंजन

HBD Priyanka: प्रियंकाने लग्नापुर्वी 'या' अभिनेत्यांना केलं आहे डेट

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची (Bollywood) सुंदर अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आज एक मोठे नाव बनली आहे. अभिनेत्रीची ओळख केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. अभिनेत्री हॉलिवूड (Hollywood) चित्रपट आणि सीरिजमध्ये सतत काम करत आहे.पण अभिनेत्रीची सुरुवात बॉलीवूडमधूनच झाली होती. प्रियांका चोप्रा आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करीत आहे. या अभिनेत्रीने 2002 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात तिच्या 'थमीजन' चित्रपटाद्वारे केली होती. देसी गर्लने गेल्या 19 वर्षात बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत बरेच काम केले आहे. अभिनेत्रीने स्वत: साठी हॉलिवूड पतीही निवडला आहे. होय, 2018 मध्ये प्रियंका चोप्राने निक जोनाससोबत (Nick Jonas) भारतात लग्न केले होते.(Priyanka Chopra dated these stars before becoming Nick Jonas wife)

अक्षय कुमार

पण निक जोनसशी लग्न करण्याआधी अभिनेत्रीचे बरेच संबंध होते. ज्यामुळे ती बर्‍याचदा चर्चेत राहिली आहे. प्रियंका चोप्राचा 'ऐतराझ' हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने नकारात्मक भूमिका केली होती. या सिनेमात प्रेक्षक प्रियंका चोप्राच्या स्टाईलने गोठलेले होते. ज्यामुळे ती लोकांच्या नजरेत आली होती. या चित्रपटात अभिनेत्री अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात करीना कपूर खान देखील होती. पण प्रियंका हे नाव अक्षय कुमारशी जोडले जाऊ लागले. त्याचबरोबर या चित्रपटाच्या नंतर प्रियंका चोप्रा अक्षय कुमारसोबत बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. ज्यामध्ये अंदाज, वक्त, सारख्या सर्व सिनेमांचा समावेश आहे पण जेव्हा दोघांबद्दल बर्‍याच बातम्या समोर आल्या तेव्हा अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाला मधे यावेच लागले. वक्त चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ट्विंकल आणि प्रियंका चोप्रा यांच्यात जोरदार भांडण झाले होते. जेव्हा ट्विंकल खन्नाने सेटवर कॉल केला. ज्यांनंतर त्यांचे संबंध तुटले. दरम्यान, ही जोडी सलमान खानसमवेत मुझसे शादी करोगीमध्ये दिसली.

शाहरुख खान

प्रियंका चोप्राच्या या यादीमध्ये शाहरुख खानचेही (Shah Rukh Khan) नाव आहे. शाहरुख आणि प्रियंका चोप्राच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावरही चर्चेत आल्या. असं म्हणतात की डॉनच्या शूटिंगदरम्यान हे दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. पण जेव्हा या सर्व गोष्टी गौरी पर्यंत पोहचल्या तेव्हा तिने प्रियंका चोप्राला आपल्या पतीपासून दूर राहण्यास सांगितले आणि यासोबत गौरी खाननेही शाहरुखवर खोद घेतली. त्यानंतर दोघांनी कधी एकत्र काम केले नाही.

याशिवाय अभिनेत्रीने शाहिद कपूर आणि हरमन बावेजा यांनाही डेट केले आहे. या दोघांसोबत अभिनेत्रीसुद्धा बर्‍याचदा स्पॉट झाली आहे, ज्यामुळे तिचे नाव बर्‍यापैकी चर्चेत आले आहे. पण आता प्रियंका चोप्रा विवाहित असून न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT