Prabhas Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Prabhas Viral Video: 'अन् प्रभासला बसली कानशिलात...' व्हिडिओ झाला व्हायरल

Prabhas Viral Video: यावेळी त्याची एक चाहतीदेखील त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आली होती. ती खूप आनंदात दिसत होती.

दैनिक गोमन्तक

Prabhas Viral Video: बाहुबलीचा प्रभास अनेकांचा आवडता अभिनेता आहे. सध्या त्याच्या सालार चित्रपटाची भलतीच चर्चा आहे.

मात्र आता तो त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका व्हिडिओमुळे चांंगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

एका चाहतीने प्रभासच्या गालावर मारुन पळून गेल्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसते. प्रभासदेखील आपल्यासोबत काय होत आहे याबाबत आश्चर्यात असल्याचे दिसून येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासचा हा व्हायरल व्हिडिओ 2019 सालचा आहे. जेव्हा त्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. अभिनेत्याने सर्वांसोबत पोझ दिली.

यावेळी त्याची एक चाहतीदेखील त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आली होती. ती खूप आनंदात दिसत होती.

या आनंदाच्या भरात फोटो काढून झाल्यानंतर नकळत प्रभासच्या गालावर चापट मारली. त्यानंतर प्रभासदेखील आपल्यासोबत काय होत आहे या विचारात गालाल हात लावल्यासारखा दिसून आला.

प्रभासचा 'सालार' हा चित्रपट यापूर्वी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर त्याची तारीख वाढवण्यात आली.

आता त्याची टक्कर शाहरुख खानच्या मोस्ट अवेटेड 'डिंकी' या चित्रपटाशी होणार आहे. हा चित्रपट ख्रिसमस, 2023 दरम्यान प्रदर्शित होऊ शकतो.

'सालार' फेम चित्रपटाचा प्रभास खूप चर्चेत आहे. आतापर्यंत त्याचा एकही चित्रपट 'बाहुबली'ला टक्कर देऊ शकलेला नाही. आता तो दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT